जत शहर डेंगू सदृष्य आजाराने त्रस्थ
सुस्तावलेली आरोग्य यंत्रणा लक्ष देईना
जत,प्रतिनिधी : जत शहर डेंगू सदृष्य आजाराने त्रस्थ असून शहरातील विविध खाजगी दवाखान्यात पेंशी कमी झालेले अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. शहरात गत पंधरवड्यात झालेल्या पावसाने डांसाची पैदास मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे डेंगू सदृष्य आजाराने थैमान घातले आहे. मात्र जत शहरातील सुस्त आरोग्य यंत्रणा फक्त सर्व्हे करून वेळ मारून नेहत असल्याचे नागरिकांचे आरोप आहेत.
शहरात दिवसा ढवळ्या डास शहरात कोणत्याही उघड्या भागात उभे राहू देत नसल्याचे चित्र आहे. भरलेले ओडापात्रे, नाले,डबकी यामुळे डांसाची उत्पंती मोठ्या संख्येने होत आहे. स्टँड,मंगळवार पेठ,अनेक चौकात,शासकीय कार्यालय परिसरात दिवसा ढवळ्या उभ्या नागरिकांना डास फोडून काढत आहेत.त्यामुळे ताप,पेशी कमी झाल्याचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जत शहरातील अनेेेक खाजगी दवाखान्यात पेंशी कमी झालेले रुग्ण उपचार घेत आहेत. खाजगी रुग्णालयाचा उपचाराचा खर्च आवाक्याबाहेर असल्याने बिले भरताना मोठी गोची होत आहे.दुसरीकडे नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असणाऱ्या आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी गलेलठ्ठ पगार घेऊनही दुर्लक्ष करत असल्याचे आरोप होत आहेत. याकडे जिल्हा आरोग्य विभागाकडून तपासणी करून कारवाई करावी अशी मागणी होत आहे.





