आज मतदान 81 ग्रामपंचायतीसाठी तगडा संघर्ष आज मतपेठीत बंद होणार

0
5

आज मतदान 

81 ग्रामपंचायतीसाठी तगडा संघर्ष आज मतपेठीत बंद होणार 

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील 81 ग्रामपंचायतीसाठी तगडा संघर्ष आज मतपेठीत बंद होणार आहे. अगदी खालच्या पातळीवर जाऊन प्रचार करण्यात आला आहे. निवडणूक रिंगणात असलेल्या सदस्य पदासाठी सुद्धा दोन ते लाखावर खर्च झाले आहेत. संरपच पदाचे आकडे मोठ्या गावात पंधरा लाखावर तर छोट्या गावात पाच ते दहा लाखापर्यत पोहल्याची चर्चा आहे. एंकदरीत निवडणूक प्रक्रियेनंतर खराचं विकास होणार का? यावर संशोधन करावे लागणार आहे. जत तालुक्यातील संख,जाड्डरबोबलाद,माडग्याळ,येळवी,डफळापूर,बाज गावात तुल्यबंळ संघर्ष व खालच्या पातळीवर जाऊन झालेल्या प्रचार लोकशाहीला प्रेरक कद्यापी नसणार आहे. 

शनिवारी दिवसभर प्रचारसभा, मतदारांच्या भेटीगाठी, बैठकांवर जोर होता. नेतेमंडळीही पायाला भिंगरी लावून दिवसभर प्रचारात व्यस्त होती.रविवारी गुप्त मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा आहे.ही निवडणूक राजकीय वर्चस्व स्पष्ट करणार आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सोमवारी मतदान असून आता छुप्या प्रचाराने रविवार संपला आहे. मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. संवेदनशील गावात जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहेत.  81 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी गेले दीड महिने ‘इलेक्शन फिवर’ जोरात  झाला. गेल्या दहा दिवसात प्रचार शिगेला पोहोचला होता. निवडणूक ग्रामपंचायतीची असली तरी आमदार, प्रमुख नेतेमंडळींनी जत तालुक्यात तळ ठोकला होता. निवडणूक प्रचारावर नेत्यांचे बारकाईने लक्ष होते. आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून नेत्यांनी या निवडणुकीकडे पाहिल्याने प्रचारात रंगत आणि चुरस आली. 

चौकट 

आमदार विलासराव जगताप व कॉग्रेस नेते विक्रम सांवत यांच्या प्रतिष्ठेची व आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम ही ग्रामपंचायत निवडणूक होत आहे.तालुक्यातील 111 ग्रामपंचायती पैंकी 80 ग्रामपंचायतीच्या निवडूणूका होत आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकीसाठी आपला गट बळकट करण्यासाठी दोघांनीही मोठे प्रयत्न केले आहेत. यात जनता कुणाला स्विकारणार यांचा उद्या फैसला होणार आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here