तालुका निर्मितीच्या उंबरठ्यावरील संखच सत्ताकेंद्र ताब्यात ठेवण्यासाठी काटा मतदान

0

तालुका निर्मितीच्या उंबरठ्यावरील संखच सत्ताकेंद्र ताब्यात ठेवण्यासाठी काटा मतदान 

संख,वार्ताहर : जत पुर्व भागातील संखसह परिसरातील गावातील ग्रामपंचायत निवडणूकीत मोठ्या संघर्ष पुर्ण परिस्थितीत मतदान पार पडले.एकूण 73 टक्के मतदान झाले. टोकाचा प्रचार यंत्रणा राबविलेले उमेदवांरानी सुटकेचा निश्वास सोडला. वाळू तस्करीमुळे भोर नदी काठावरील गावात सत्ता मिळविण्यासाठी तस्करीतील स्वंयघोषीत नेते उतरल्याने मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाला. संखची ग्रामपंचायत निवडणूक तुल्यबंळ झाली. जतनंतर तालुका निर्मितीच्या उंबरठ्यावर असणाऱ्या संखच सत्ताकेंद्र ताब्यात ठेवण्यासाठी तालुक्यातील ताकतवान नेते बसवराज पाटील,आर. के. पाटील यांचा तगडा संघर्ष पाह्याला मिळाला. शेतकरी संघटनेतून बाहेर पडून वेगळी चुल मांडलेले डॉ. भावसो पवार यांनीही मोठे आवाहन उभे केले आहे. त्यामुळे संरपच पदासाठी काटा लढत झाली आहे. सोमवारी झालेल्या मतदान शांततेत पार पडले. वार्ड क्र. 3 मधील मतदान मशिन सतत बंद पडत असल्याने तेथे उशिरापर्यत मतदान सुरू होते. केंद्राबाहेर सायंकाळी मतदान वेळ संपल्यानंतरही मोठी रांग होती. रविवारी रात्री मुसळधार पाऊस पडल्याने बोरनदीच्या पुलावरून पाणी वहात होते.  त्यामुळे नदीपलिकडील मतदारांना दुपारपर्यंत मतदान करता आले नाही.  त्यांच्यासाठी मतदानाची वेळ वाढवून देण्यात आली.टँक्टर मधून मतदार आणावे लागले.झालेले मतदान वार्ड 1,1057 पैंकी 736, वार्ड 2, 743 पैंकी 530,वार्ड 3,1324 पैंकी 972,वार्ड 4,1073 पैंकी 851,वार्ड 5,1085 पैंकी 794,वार्ड 6,951 पैंकी 741, एकूण 6233 पैंकी 4764 म्हणजे   76 टक्के मतदान झाले आहे.

Rate Card

संख येथे मतदान केंद्राबाहेर झालेली गर्दी

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.