जत शहरात फायर बिग्रेडची गाडी कधी?
मंजूरीनंतरही हालचाली नाहीत : आग लावून मोठी जिवित हानी झाल्यावर नगपालिका जागी होणार काय?
जत,प्रतिनिधी : जत शहरात पुन्हा एकदा फायर बिग्रेड गाडीची गरज आधोरेखित झाली आहे. लोकप्रिनिधिच्या दुर्लक्षाने पन्नास हाजारावर लोकसंख्या असलेल्या जतची आग लागल्यास मोठा बाका प्रंसग उद्भवू शकतो. शुक्रवारी जत शहरात मुख्य महामार्गावर एका दुकानला आग लागल्याने पुन्हा फायर बिग्रेड गाडीची गरज बनली आहे.आगीत पुर्ण साहित्य जळून खाक झाले आहे. जत फायर बिग्रेडची गाडी असती तर आग आटोक्यात आणण्यात यश आले असते. जत शहरातील मोठ्या विस्तार झाला आहे. अनेक गल्ल्यात खेचून खरे बांधली आहेत. समजा अचानक आगीची परिस्थिती उद्भवीली तर मोठा अनर्थ व जिवित हाणी होऊ शकते. त्यामुळे नगरपालिकेच्या स्थापने पासून फायर बिग्रेडच्या गाडीची मागणी होत आहे.गाडी मंजूरही आहे. मात्र निधी किंवा अन्य कारणाने तो विषय थांबला आहे.त्यामुुुुळेे मोठी जिवित हानी झाल्यावर नगपालिका जागी होणार आहे काय?असा संप्तत सवाल नागरिक विचारत आहेत.शुक्रवारच्या प्रंसगावरून तरी नगरपालिका प्रशासनाने गांभिर्याने घेऊन फायर बिग्रेड गाडी आणी अशा मागणी आहे. जत शहरात एकादे वेळी मोठी आग लागली तर तासगाव पालिकेची किंवा सांगली महापालिकेची गाडी मागवावी लागते. मात्र हे अंतर तासगाव 80,सांगली 100 किलोमीटरच्या आसपास आहे. तेथून गाडी येण्यास किमान दीड तास लागतो. तोपर्यतर काही होऊ शकते या विचार न केलेला बरा..
जतसह तालुक्यातील अनेक गावात अशा अगी लावून जिविंत हानी झाली आहे, जनावरे दगावली आहेत. मोठे आर्थिक नुकसानही सोसावे लागले आहे. एंकदरीत फायर बिग्रेडची गाडी असती तर काही प्रमाणात हानी, व नुकसान थांबवता येऊ शकते.
जतशहरातील विजापुर-गुहाघर
मार्गावरील बाजार समितीच्या एका गाळ्याला आग लागल्याने धुराचे लोट असे गगणाला भिडत होते.