जत विभागातील 70 सराईत गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक कारवाई
जत,उमदी,कवटेमहांकाळ पोलिस ठाण्याचा समावेश : स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या केसेस
जत,प्रतिनिधी : ग्रामपंचायत निवडणूकीच्या पाश्वभुमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राकण्यासाठी जत विभागीय पोलिस क्षेत्रातील जत,उमदी, व कवटेमहांकाळ पोलिस ठाणे हद्दीतील 70 सराईत गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्यांची माहिती उपअधिक्षक नागनाथ वाकुर्डे यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीच्या वतीने जतेत बुधवारी घेण्यात आलेल्या कॅम्प मध्ये हि कारवाई केली. यावेळी गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक राजन माने,जतचे पोलिस निरिक्षक राजू तासिलदार,महादेव नागणे,अमित परीट उपस्थित होते.
जतसह उमदी व कवटेमहांकाळ पोलिस ठाणे हद्दीत होऊ घातलेल्या ग्रामपंचायती निवडणूकीत हे पोलिस रेकार्डवरील गुन्हेगार दहशत माजवून नागरिकांना भयभित करू शकतात.त्यांच्या मुळे कायदा सुव्यवस्था बिघडू शकते. म्हणून अशा पोलिस रेकार्डवरील गुन्हेगार कारवाईसाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरेपाटील यांच्या आदेशाअन्वये, जिल्हा पोलिस प्रमुख दत्ताञय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस मुख्यालंयापासून जादा अंतरावर असणाऱ्या पोलिस ठाणे हद्दीत या केसेस चालाव्यात यासाठी कँम्पचे आयोजन केले होत. त्यात जत पोलिस ठाणे हद्दीतील 107 पैंकी 18,उमदी 107 पैंकी 00,110 पैंकी 5,कवटेमहांकाळ 107 पैंकी 13,110पैंकी 5 केसस वर सीआरपीसी 107,109,110 नुसार 64 केसेस दाखल करून 70 जणावर बंद पत्राची कारवाई करण्यात आली. या कारवाई रेकार्डवरील गुन्हेगारावर यापुढे हुल्लडबाजी किंवा अऩ्य काही गुन्हे घडल्यास कठोर गुन्हे दाखल होऊ शकतात. कारवाईचा कार्यकाळ 1 वर्षाचा आहे. त्यामुळे निवडणूकी दरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्या गुन्हेगारावर वचक बसणार आहे.
चोकट
जत व उमदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 160 जणावर 144/2 नुसार हद्द पारीचे प्रस्ताव तयार केले आहेेत. त्यांपैंकी 70 प्रांताधिकारी कार्यालयाकडे पाठविले आहेत. त्यावर आज कारवाई होईल. त्यामुळे स्थानिक पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हेगाराना चाफ बसेल.अशी माहिती उपअधिक्षक नागनाथ वाकुर्डे यांनी दिली.