दलालाचा विळखा हटणार का ? | नव्या तहसीलदारासमोर आवाहनाचा डोंगर ; कार्यालयासमोरील विद्रूपीकरणावर कारवाईची गरज

0
3
जत,संकेत टाइम्स : जत‌ तब्बल सव्वा महिन्यानंतर आलेले तहसीलदार जीवन बनसोडे यांच्यासमोर आवाहनाचा मोठा डोंगर आहे.कार्यालयातील दलालराज,तलाठी,मंडल अधिकाऱ्यांची मक्तेदारी संपविणे, कर्मचाऱ्यांकडून होणारी नागरिकांची लुट,अनेक दिवसापासून ठिय्या मारलेले मालदार टेबलचे ठाणेदार बदलणे,त्याशिवाय कार्यालयासमोर अतिक्रमण मुळे झालेले विद्रुपीकरण हटविण्याचे प्रमुख आवाहन नवे तहसीलदार पेलणार काय ? याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
जतचे यापुर्वीचे मवाळ तहसीलदार सचिन पाटील यांच्यामुळे नागरिकांना कार्यालयातील प्रत्येक कामासाठी दलालाची मदत घेण्याची वेळ लाचखोर कर्मचाऱ्यांनी आणली आहे.थेट जाणाऱ्या नागरिकांचे हेळसाड करून त्यांना हाकलून देण्यापर्यत काही कर्मचाऱ्यांची मजल गेली आहे. प्रत्येक अधिकाऱ्यांचे ठरलेले दलाल दिवसातून पंचवीस वेळा कार्यालयात हेलपाटे घालत असतात.अशा लुटारू ‌कर्मचाऱ्यांना वेसन घालण्याचे शिवधनुष्य नव्या तहसीलदारांना उचलावे लागणार आहे.
जिल्ह्यात मोठ्या असणाऱ्या तालुक्यातील तलाठी,मंडल अधिकारी सज्जाच्या ठिकाणी निवासी राहत नाहीत.निम्यावर तलाठ्याचा कारभार‌ जतच्या तलाठी भवनमधून चालतो‌ आहे.त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सोसावा लागत आहे.तालुक्यात हे दु:ख समजणारा कोण वालीच नसल्याने तलाठी,मंडल अधिकारी बेधडक नागरिकांना नागवत आहेत.त्यांना नियंत्रणात आणण्याची मोठी जबाबदारी नव्या तहसीलदारांना पार पाडावी लागणार आहे.
तहसील कार्यालयाचे बांधकाम सुरू असल्याने गोडावूनमध्ये हलविलेेल्या तहसील कार्यालयातील व कार्यालयासमोर व्यवसायिकांनी केलेले विद्रुपीकरण हटविण्याचे मोठे आवाहन नव्या तहसीलदारांना उचलावे लागणार आहे.
जत तहसील कार्यालयातील टेबल पुराण चांगलेच चर्चेत आहे.नवे तहसीलदार येण्या अगोदर काही कर्मचाऱ्यांचे टेबल बदलण्यात आले आहेत. यातील काही कर्मचाऱ्यांनी नव्या टेबलचा पदभार स्विकारला आहे मात्र काही लुटारू कर्मचाऱ्यांना मालदार टेबल सोडू वाटत नाही.त्यांना हलविण्याची धडक कारवाई नव्या तहसीलदारांकडून अपेक्षीत आहे.

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here