जतेत १५ दिवसानंतर पुन्हा पावसाची हजेरी

0
जत,संकेत टाइम्स  : गेली पंधरा दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने आज पुन्हा संततधार सुरू केली आहे. गेली दोन दिवस उन्हाच्या तडाखा होता; मात्र आज दुपारी दोननंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे.आज सकाळी ऊन आणि दुपारी पाऊस सुरू झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.पावसाळा संपत असताना ही पावसाने रिमझीम सुरूच ठेवली आहे.
पाऊस संपला अशी स्थिती शहरात होती, मात्र आज सकाळी ऊन आणि दुपारनंतर पाऊस सुरू झाल्याने अनेकांची तारांबळ उडाली. शहरासह उपनगरात काही ठिकाणी नाले तुंबल्याने रसत्यावर आलेल्या पाण्याने वाहतूक विस्कळीत झाली. पाऊसाच्या काही जोरदार सरींनी शहरात पाणीच पाणी केले.
Rate Card
ढगाळ वातावरण आणि पावसामुळे शहरातील गर्दीवर काहीच झाला नसल्याचे दिसून आले.दरम्यान शहरात पुन्हा नगरपरिषदेचा कारभार चव्हाट्यावर आला.दुपारी झालेल्या दमदार पावसाने अनेक रस्त्यावरील पाणी गटारी उंच व रस्ता खाली झाल्याने थेट रस्त्यावर डोह तयार झाला होता. 
जत शहरात मंगळवारी झालेल्या पावसाने अनेक भागातील रस्त्यावर डोह तयार झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.