डफळापूर, संकेत टाइम्स : कोरोनाचा प्रभाव कमी झालेल असतानाच डफळापूर ता.जत येथील कोळी वस्ती येथे डेंगूची साथ फैलावली असून सुमारे १५ वर रुग्णावर जत,कवटेमहांकाळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीकडून साथ रोकण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत.
डफळापूर-अंनतपूर रस्त्यावर असणाऱ्या कोळी वस्तीच्या दोन्ही बाजूला दोन तलाव आहे.त्यामुळे तेथील अनेक भागात पाणी लागले असून त्यात जनावराचे गोठे,सांडपाणी यांचा निचरा होत नसल्याने डेंगूच्या डांसाची उत्पत्ती वेगाने होत आहे.त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गत आठवड्यापासून डेंगूने डोके वर काढले असून अनेक रुग्णांना डेंगूची लागण झाली आहे.
दरम्यान गत चार महिन्यापासून डफळापूर गावभाग व वाड्यावस्त्यांवर पाऊस व कँनॉलमधून पाणी सोडल्याने पाणी पातळी वाढली आहे.त्यामुळे अनेक भागात पाणी थांबून राहिल्याने डबकी तयार झाली आहे. गाव भागात अनेक गटारी तुंबल्याने धोका बळावला आहे.पावसाळ्यापुर्वी ग्रामपंचायत व डफळापूर प्राथमिक आरोग्य केंद्राकडून संयुक्त मोहिम राबवून साथ रोग रोकण्यासाठी मोहिम राबविण्याची गरज होती मात्र तसे न झाल्याने साथीच्या आजाराचा फैलाव झाला आहे.
दरम्यान कोळी वस्तीचा बोध घेऊन गाव भाग व अन्य वाड्या वस्त्याचा सर्व्हे करून पाण्याचा निचरा,डांस प्रतिबंधित औषध फवारणी,नागरिकांत जागृत्ती करण्याची गरज आहे.