जत,संकेत टाइम्स : जत येथील भूमी अभिलेख कार्यालयात खाजगी कर्मचाऱ्यांची शेतकरी, नागरिकांवर अन्याय करणारी मुजोरी सुरू आहे. नागरीकांना वेठीस धरून आर्थिक लूट करण्यात भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी अनेक कामासाठी दलाल व खाजगी कर्मचारी ठेवून त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत आहे त्यामुळे शेतकरी चांगलेच हवालदिल झाले आहेे.
अगदी वीस रूपयाचा नकाशा काढण्यासाठी तब्बल १००-२०० रुपयाचा दर कर्मचाऱ्यांने घेतल्याची तक्रार बेंळूखीतील शेतकरी सागर माने यांनी थेट नुतन भूमि अभिलेख कार्यालयात नव्याने आलेल्या अधिकाऱ्याकडे केली,मात्र मी परवाच जादा पैसे घ्यायचे नाहीत असे सांगितले आहे,असे जुजूबी उत्तर देऊन वेळ मारून नेहली.अधिकाऱ्यांचा आदेश कर्मचारी मानत नसतीलतर अधिकारी नेमायचेच कशाला असा संतप्त सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
तालुक्यात सर्वात जास्त लुटीचे कार्यालय मधून भूमि अभिलेख कार्यालयाची चर्चा आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना नागविल्याशिवाय कोणत्याही कागद दिला जात नाही.विशेष म्हणजे शासकीय फीच्या दहापट रक्कम येथील कर्मचारी अगदी राजरोसपणे लुटत आहेत.थेट कार्यालयात अशा पध्दतीने मागणी कर्मचारी करत असतील तर शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कुणाकडे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
जत तालुक्याचे सुपुत्र म्हणून नवे अधिकारी हजर झाले आहेत. परंतु आजही कामात सुधारणा न करता नियमबाह्या कामाचा सपाटा सुरू आहे. अनेक दिवसापासून नियमबाह्य मोजणीबाबत अनेक तक्रारी असून जिल्हा भूमी अधिक्षक यांनी खातेनिहाय सखोल चौकशी करून उपअधीक्षक यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. भूमी अभिलेख कार्यालयात अनधिकृत दलाल व खाजगी कर्मचारी अधिकृत कामेही करण्यासाठी विनाकारण अडवणूक करत आर्थिक मागणी करत आहेत.
कार्यालयातील शिपाई नकला तयार करण्याचे काम करत असून शिपाई यांना तांत्रिक ज्ञान नसतानाही नक्कल तयार करण्याचे नियमबाह्य काम करत आहेत. अनेक नकलेचे व मोजणीचे अर्ज प्रलंबित असून आर्थिक देवाणघेवाण करणाऱ्यास नागरिकांना प्रवृत्त केले जात असून पैसे दिल्याशिवाय काम होत नाही अशी परिस्थिती निर्माण केली जात आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून खाजगी कर्मचारी, दलाल यांचा मोठ्या प्रमाणात कार्यालयात वावर आहे. वृद्ध शेतकऱ्यांना कार्यालयात ताटकळत उभे ठेवले जात आहे,अनेक कर्मचारी हे आपल्या पदाचा दुरुपयोग करत असल्याने त्यांच्या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज आहे, आशा पद्धतीने शेतकऱ्यांना यांच्या मोजणी कामासाठी वारंवार त्रास देत असल्याने अनेक तक्रारी होत आहेत अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही कारवाई करत नसल्याने त्यांचाही अशा कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्याचे पाठबळ तर नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे.
अशा बेजबाबदार लोकसेवकाची सखोल खातेनिहाय चौकशी करून तत्काळ निलंबित करावे अशी मागणी नागरिक करीत आहेत जेणेकरून शेतकरी, नागरिकांचा महसूल विभागावर विश्वास राहील आणि न्याय मिळेल भविष्यात कारवाई न झाल्यास शेतकरी बांधवांसह नागरिकांना उपोषण करावे लागल्यास याबाबत आश्चर्य वाटायला नको.
जत येथील भूमीअभिलेख कार्यालयासमोर दररोज शेतकऱ्यांची अशी गर्दी असते.