जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील माजी सैनिकांच्या ज्या समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी संघटना असणे गरजेचे आहे.कोणतेही कठीण काम सर्वांनी एकत्र येऊन केल्यास सार्थकी लागते.सर्वांनी मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे,संघटनेला हातभार लावावा,असे मत महाराष्ट्र राज्य माजी सैनिक महामंडळाचे अध्यक्ष कर्नल भगतसिंग देशमुख यांनी केले.
जत येथील एक्स सर्विसमेन वेलफेअर असोसिएशन संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन कर्नल देशमुख यांच्याहस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते.कर्नल देशमुख पुढे म्हणाले, तालुक्यात एक्स सर्विसमेन अनेक अडचणीचा सामना करतात,स्थानिक समस्या,बँका,नोकरीचे कार्यालये येथे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.असे प्रश्नावर संघटन न्याय मिळवून देते.त्यामुळे आपली संघटना मजबूत झाली पाहिजे.
संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्ता शिंदे म्हणाले की, तालुक्यातील माजी सैनिकांवर होणारे अत्याचार तसेच वीरमाता व वीरपत्नी यांच्यासाठी सहयोग करणे तसेच माजी सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी व संस्था वाढीसाठी एकसंघपणे काम करु,त्याचबरोबर सामाजिक कार्यही करु. त्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे.
सेवानिवृत्त सुभेदार मेजर (ऑन.कॅप्टन) बबनराव जगन्नाथ कोळी उपाध्यक्ष,सेवानिवृत्त हवालदार महेशकुमार वामन जगताप उपाध्यक्ष,सेवानिवृत्त हवालदार बाळासाहेब दादासाहेब भोसले सचिव,सेवानिवृत्त हवालदार विजय गोविंद पवार खजिनदार,सेवानिवृत्त हवालदार दत्तात्रय आकाराम शिंदे खजिनदार,सेवानिवृत्त सुभेदार मेजर (ऑन.कॅप्टन) विजय शिवाजी कुरणे सदस्य,सेवानिवृत्त ऑन.सुभेदार मेजर आकाराम गणपती बिसले सदस्य,सेवानिवृत्त ऑन.सुभेदार मेजर सिध्दु रामू गायकवाड सदस्य, सेवानिवृत्त ऑन. सुभेदार मेजर सतिश रंगराव शिंदे सदस्य, सेवानिवृत्त हवालदार दिपक आनंदा खांडेकर सदस्य यांचेसह एक्स सर्विसमेन वेलफेअर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच सर्व माजी सैनिक उपस्थित होते.
जत येथे एक्स सर्विसमेन वेलफेअर असोसिएशन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
Attachments area