सांगली : बायकोचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पतीस दोषी ठरवत न्यायालयाने सात वर्षे सक्त मजूरी व १० हजार रूपयाचा दंड सुनावला. सांगली येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश २ डि.पी. सातवळेकर यांचेसमोर हा खटला सुरू होता. यातील आरोपी मछिंद्र नामदेव बनसोडे (वय ४१ वर्षे, रा. लिंगनूर (खटाव), ता. मिरज, जि. सांगली) याला भारतीय दंड विधान संहिता कलम ३०७ प्रमाणे दोषी ठरविण्यात आले आहे. सरकारपक्षातर्फे अति. जिल्हा सरकारी वकिल अनिल एन, कुलकर्णी यांनी काम पाहिले.
याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, आरोपी पत्नीवर संशय घेतो,दारु पिवून मारहाण करतो व माहेरहून पैशाची मागणी करतो म्हणून त्याची पत्नी ही मुलांना घेवून माहेरी कवठेमहंकाळ येथे राहण्यास गेली व तिने आपल्या मुलांचा शाळेचा दाखला माहेरच्या गावामध्ये मागवून घेतला. त्याचा राग मनात धरुन आरोपी याने दिनांक २७ ऑक्टो २०१५ रोजी पत्नी कवठेमहकांळ गावी मसोबा गेट ते हिंगणगाव जाणारे उत्तर दक्षिण रोडचे लगत कामासाठी गेली असता कामाच्या ठिकाणी जावून तिला बाहेर बोलावून घेवून मुलाना शाळेचा दाखला का काढून आणलास असे म्हणून शिवीगाळ करुन तुला जिवंत ठेवत नाही असे म्हणाला व त्याचे हातातील सुऱ्याने पत्नीच्या पोटावर वार केला. त्यावेळी पत्नीच्या पोटास व दोन्ही हाताला गंभीर दुखापत झाली.
त्यावेळी लोकांनी आरोपीस पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.त्यानंतर पत्नीने कवठेमहंकाळ पोलीस स्टेशनला तक्रार दिली. याकामाचा सखोल तपास होवून तपास अधिकारी श्री. क्षिरसागर अधिकारी यानी मे. कोर्टात आरोपपत्र दाखल केले.जिल्हा व सत्र न्यायाधीश २ डी.पी.सातवळेकर यांचे न्यायालयात सुरू होती.याकामी सरकार पक्षातर्फे एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले.याकामी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार वैद्यकीय पुराना व इतर कागदोपत्री पुरावा याचा विचार करण्यात आला.उपलब्ध साक्षीपुराव्याचे आधारे आरोपी मच्छिंद्र बनसोडे यास शिक्षा सुनावण्यात आली.