संख : उमदी पोलीसांनी पुन्हा डोंगर पोकरून उंदीर पकडला आहे.उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेकडो एकर गांज्याची लागवड होत असल्याचे अनेक वेळा आरोप झाले आहेत.याची माहिती स्थानिक बीटला नेमलेल्या शुक्राचार्यांना असतेचं,मात्र त्यांच्यावर अधिकाऱ्यांनी दबाव टाकला की ते मोठी कारवाई केल्याचा आव आणत किरकोळ छापामारी करून काही किलोचा गांजा पकडून अधिकाऱ्यासमोर पाठ थोपटून घेत आहेत.मात्र जेथे राजरोसपणे शेकडो एकर गांज्याच्या शेतीला अभयं यामागचे आर्थिक गौडबंगाल जगजाहीर आहे.
नुकतीच उमदी पोलीसांनी संख (ता. जत) येथील शिवानंद परमेश्वर वाघोली (३०) यांच्या मिरचीच्या शेतात छापा टाकून सहा किलो ओला व तयार गांजा उमदी पोलिसांनी पकडला. बाजारात याची ६० हजार रुपये किंमत आहे. ही कार्यवाही शनिवारी दुपारी चार वाजता
केली.
याप्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून संशयित शिवप्पा परगोंडा वाघोली याला अटक करण्यात आली.संख-खंडनाळ रस्त्यालगत शिवप्पा वाघोली याचे शेत आहे. शेतात त्याने मिरचीची लागवड केली आहे.त्याने मिरचीच्या पिकात गांजा लावल्याची माहिती उमदी पोलिसांना मिळाली.त्यानुसार सहाय्यक निरीक्षक पंकज पवार व उपनिरीक्षक एस. एस. शिंदे यांच्या पथकाने शनिवारी दुपारी ४ वाजता शेतात छापा टाकला. यावेळी मिरचीच्या पिकात ४ फूट उंचीची गांजाची परिपक्व झाडे मिळून आली.
त्यांचे वजन ६ किलो भरले. त्याची किंमत अंदाजे ६० हजार रुपये आहे.सहाय्यक निरीक्षक पंकज पवार,उपनिरीक्षक एस. एस. शिंदे, सहाय्यक फौजदार भगवान कोळी, हवालदार नागेश खरात, पोलीस नाईक सिध्दाप्पा बनेण्णावर, इंद्रजित गोदे, नितीन पलूसकर, कोतवाल कामराज कोळी,मडू कोळी यांनी ही कारवाई केली.