शब्दांचं शब्दांशी शब्दशः नातं!

0
6

मन नाही थाऱ्यावर
जणु फिरे वाऱ्यावर
जिवा लावी हूर हूर
 नको जाऊ दूर दूर …..

अशी स्थिती प्रत्येकाची असते. पण काय करणार मनाचा नाही मनावर ताबा तर कळेल कसा समोरचा साधा. घटोस्पोट असो किंवा कायमचे जग सोडून जाणे असो हा काही अंतिम पर्याय नाही. पण का कोणास माहीत यालाच आपलंसं करून बसत आहेत या समाजातील नाती, पण असा कोणी विचारही करत नाही किंवा करण्याचा प्रयत्नही करत नाही जीवनाच्या वाटेवर आपला सगळ्यात सुंदर सोबती म्हणजे आपला आत्मविश्वास असतो, जोपर्यंत आपला स्वतःचा आत्मविश्वास आपल्या सोबत आहे

 

 

तोपर्यंत सर्वच सहज सोपे आहे हे तर मान्य करावच लागेल कारण, आपले शब्द आपलं वागणं इतरांना काहीही दाखवत असेल तरी आपल्याला स्वतःला माहीत असतं खरं आणि खोटं कितपट आहे. तेव्हा समोरच्याला खरं खोटं सांगत बसण्यापेक्षा आत्मपरीक्षण स्वतः करावं लागतं तेव्हा तुमच्या ज्या हालचाली असतील त्यातून ते स्पष्ट दिसत असतं. 24 ऑक्टोंबर 2021 म्हणजेच कालचीच बातमी आहे मनोज वाघ या तीस-पस्तीस मधल्या युवकाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आणि या घटनेच्या तीन आठवड्यापूर्वीच त्याच्या पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केली होती तर सांगा याच्यातून काय साध्य झाले, दोघेही उच्चशिक्षित, दिसायला सुंदर, राहण्यासाठी स्वतःचं घर, मुलं सर्वच होतं तर मग झालं काय? हा प्रश्न सर्वांनाच…

 

 

पण, होणार काय आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो मग तिथे स्वार्थ नाही, मीपणा नाही, खरं खोटं नाही फक्त असतं ते आपलं नातं. खरी आपुलकी माया ही फार दुर्मिळ असते आणि ज्याला याचे ज्ञान असते त्याला त्याचा खरा आनंद मिळवता येतो. काळानुसार माणसाच्या सुखसोयी राहणीमान बदलले असे आपण सहज म्हणतो पण त्यात बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत सांगायचं झालं तर काळानुसार सहनशीलता बदलली, संयम बदलला, सत्य पाहण्याचा दृष्टिकोन बदलला, सत्य स्वीकारण्याची पात्रता संपली फक्त समोर दिसत आहे ते योग्य! असा हा भाव प्रत्येक मनामनात सजला आहे. परंतु वस्तुस्थिती आहे तिचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याचा प्रयत्न करण्याचे धाडस कोणीच करत नाही आयुष्याच्या या वळणावर बरेचसे चढ-उतार आपल्यासोबत होत असतात त्याला चिटकून न बसता त्यातून मार्ग काढत चालनं हाच खरा जगण्याचा अर्थ आहे.

 

 

कोणाच्या आयुष्यात सहज सोपे असं काहीच नसतं ते आपल्याला बनवावं लागतं. श्वास घेण आणि सोडण ह्याला जगण म्हणत नाहीत प्रत्येक श्वास घेताना  आपल्या सभोवतालील नात्यांचा सुगंध आला पाहिजे आणि हा सुगंध पसरवनं आपल्याच हातात असतं. हा संपूर्ण निसर्ग आपल्याला विचारत नाही तुम्हाला सूर्यप्रकाश हवा आहे का? वारा हवा आहे का? पाऊस हवा आहे का? तो त्याची कामे न चुकता करतो मग त्याचा उपभोग सर्वच करतात, त्याच प्रकारे आपल्या विचारांचा हालचालींचा बोलण्याचा सुगंध सर्वत्र पसरू द्या तो सर्वच उपभोगतील.कोणी तुमचा सन्मान करो अथवा न करो तुम्ही तुमचे कर्तव्य करत राहा कारण संस्कारापेक्षा मोठा वारसा नाही आणि प्रामाणिकपणा पेक्षा कोणताही संस्कार नाही.

 

 

सहज आयुष्य जगायचं असेल तर मनातील असंख्य आवाज जे आपल्याला सतत ठोठावत असतात ते आधी कमी करणे आवश्यक आहे कारण अस्थिर मनाची शांतता कधीच त्याच्या हालचालीत दिसून येत नाही. कुठलंही कसल्याही नात तेव्हाच टिकतं जेव्हा शब्द कमी आणि समज जास्त असते आणि अशीच नाती पाऱ्यासारखे बनतात, त्यावर कोणीही कितीही घाव घातले तरी ते तुटत नाहीत उलट आणखीन मजबूत होतात. जेव्हा प्रत्येक नात्याचा स्वभाव इमानदार असेल तर समोरच्याच्या वागण्यात प्रामाणिकपणा येतोच….

 

–  स्वाती शंकर चव्हाण

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here