
बिळूर : बिळूर ता.जत येथील बसवराज बाळकृष्ण कुंभार यांचे मध्यरात्री बंद घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करत तिजोरीतील ५ लाखाचे दागिणे पळवून नेहल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली आहे.याप्रकरणी जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी,बिळूर गावभागातील कुंभार गल्लीतील श्री हनुमान मंदिरापाठीमागे बसवराज कुंभार राहतात.त्यांचे दुमजली घर आहे.मंगळवारी दरदिवशी प्रमाणे खालच्या मजल्याचा दरवाज्या बंद करून सर्वजण दुसऱ्या मजल्यावर झोपले होते.
यांचा फायदा घेत चोरट्यांनी घराचा दरवाज्या तोडून आतमध्ये प्रवेश करत साडेसहा तोळे सोने,१५ तोळे चांदीचे दागिणे लंपास केले आहे. दरम्यान जत पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली.सांगलीवरून श्वान पथकही मागविण्यात आले होते.मात्र चोरट्याचा माग लागू शकलेला नाही.




