जत,संकेत टाइम्स : जत शहरातील सार्वत्रिक निवडणुका पूर्वी सन २०१७ मध्ये उद्घाटन केलेल्या चार रस्तांची कामे चार वर्षे उलटूनही अपूर्णच राहिली आहेत.याकडे नगरपरिषद प्रशासनाचे व लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे ठेकेदार मोकाट आहे.या चारही कामे तातडीने सुरू करून दोषी अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी युवक नेते विक्रम ढोणे यांनी नगरपरिषदेकडे केली आहे
जत शहरातील शिवाजी पेठ येथील डॉ. विजय पाटील ते राणोजी साळे घर, गुलाब गिरणी ते नागू दुकान, माने घर ते विठ्ठल मंदिर रोड ,हराळे समाज कमान ते किरण शिंदे घर या चारही रस्ते डांबरीकरणाच्या कामाचे चार वर्षापुर्वी उद्घाटन करण्यात आले होते,परंतु रस्त्यावर फक्त खडीकरण केले असून सदर कामावर कार्पेट आणि सिलकोट करण्यात आले नाही.विशेष म्हणजे याकडे नगरपरिषदेने लक्षच दिले नसल्याने चारही कामे चार वर्षे उलटूनही अर्धवट अवस्थेत आहेत.
विकासकामे करीत असताना चार चार वर्षे कामे पूर्ण होत नसतील तर नगरपरिषद प्रशासन नेमकं काय करतंय असा गंभीर प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.या अर्धवट स्थितीत असलेल्या चारही डांबरीकरण रस्ताची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी,तसेच या कामांची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी,अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा युवक नेते विक्रम ढोणे यांनी नगरपरिषदेकडे केली आहे.
जत शहरातील हे चार रस्ते गेल्या चार वर्षापासून अर्धवट आहेत.विशेष म्हणजे भ्रष्ट पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी यांची साधी चौकशीही केली नसल्याने संताप व्यक्त होत आहे.