जत : जत तालुक्यात सराईत गुन्हेगारांकडून बालकांचा वापर केला जातो.जत शहरासह ग्रामीण भागातही विधिसंघर्षग्रस्त बालकांची संख्या वाढत आहे. तो प्रौढ होईपर्यंत अनेक गंभीर गुन्हे त्याच्या शिरावर असतात. खून, लूटमार, अत्याचार या गुन्ह्यांतील आरोपी हे तरुण १८ ते ३० या वयोगटातीलच आहे.
जत तालुक्यातील अनेक गुन्ह्यात आढळलेल्या संशयित आरोपी विधिसंघर्षग्रस्त असल्याने कायद्याच्या कचाट्यातून वाचले आहेत.तेच पुढे अटल गुन्हेगार होताच त्याशिवाय अनेक बालकांना गुन्हेगारीकडे वळवत आहेत.त्यामुळे पालकांच्या जीवाला घोर लागला आहे.
सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालल्याचे हे लक्षण आहे. वेळीच तरुणांना चांगले पर्याय उपलब्ध करून दिले नाही तर गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढत आहे. काही सराईत गुन्हेगारांकडून अशा मुलांना नादी लावले जाते.जत शहरात तर मुलांना सोबत घेऊन गांजा व दारुसारखे व्यसन लावले जाते.
नंतर त्यांचा पद्धतशीरपणे वापर होतो. शरीर दुखापतीसोबतच मालमत्तेसंबंधित गुन्ह्यातही तरुणांचाच सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. कायद्याचा धाक नसल्यासारखे ते वावरतात.
पालकांनी गंभीर होण्याची गरजजत शहरासह ग्रामीण भागात शाळकरी मुलांमध्ये धारदार हत्यार बाळगण्याचा ट्रेंड आहे. मुले गांजाच्या नशेला बळी ठरत आहे. मुलांना मोबाईल, वाहन सहज उपलब्ध होते. पालक वर्ग आपल्या दैनंदिन कामातच व्यस्त असतो. त्यामुळे मुलांच्या हालचालींकडे लक्षच देता येत नाही. यातूनच मुले वाममार्गाला लागतात. जेव्हा माहिती होते, तेव्हा वेळ निघून गेलेली असते. खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात १८ ते ३० वयोगटातीलच बंदींचा समावेश आहे.