स्वाभिमानीचे ऊस दर आंदोलन पेटणार

0
4

वाळवा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या  माध्यमातून एक रकमी एफ आर पी , वजनातील काटा मारी,आणि अतिरीक्त द्यावे लागणारे पैसे आदीसह अन्य मागण्यासाठी वाळवा आणि पलूस तालुक्यात मोटरसायकल रॅली काढण्यात आली.

 

 

 

यावेळी गांधीगिरी मार्गाने तोड घेवू नका असे आवाहन करून शेतकऱ्यांना गुलाबाचे फुल देण्यात आले तर वाहतूक करणाऱ्या वाहनांना ही विनंती करण्यात आली रॅलीचे नेतृत्व स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केले.

 

 

 

जिल्ह्यात काही कारखान्यानी एफ आर पी जाहीर केली,पण राजारामबापू व क्रांती कारखाना यांनी एफ आर पी द्यायचीच नाही असे ठरवले आहे,असे ते म्हणाले.असे झाल्यास येणाऱ्या काळात स्वाभिमानी तीव्र आंदोलन उभे करेल असा इशारा यावेळी खराडे यांनी दिला. अशा परीस्थितीमध्ये जर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडली तर  या दोन्ही कारखान्यांचे चेअरमन जबाबदार राहतील.

 

 

 

मोटार सायकल रँलीची सुरुवात आष्टा येथील बस स्टँड चौकातून झाला एक रकमी एफ आर पी मिळालीच पाहिजे, कोण म्हणतोय देत नाय घेतल्याशिवाय राहत नाही ,घामाचे दाम मिळालेच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडन्यात आला.

ह रॅ

ली आष्टा मार्गे दुधगाव,सर्वोदय कारखाना,बावची,बागणी पडवळवाडी, हुतात्मा कारखाना,वाळवा, नवेखेड,पुणदी किर्लोस्करवाडी, क्रांती कारखाना, कुंडल, दह्यारी, तुपारी, ताकारी,कराड रस्ता, बहे मार्गे राजारबापू साखर इस्लामपुर येथे राल्लीची सांगता झाली.

 

 

 

या रॅलीत पोपट मोरे,भागवत जाधव,बाबा सांद्रे,जगन्नाथ भोसले,संजय बेले,सुदर्शन वाडकर, गुंफा आवटी, शहाजी पाटील, प्रकाश देसाई, प्रताप पाटील,अभिनंदन नवले, प्रवीण पाटील, रमेश पाटील,राजेंद्र पाटील, संदीप शीरोट,काशिनाथ निंबाळकर, प्रभाकर पाटील, तानाजी साठे, आरून कवठेकर, अमर पाटील,रविकिरण माने, संतोष शेळके राजेंद्र माने,मारुती डंगारणे, बाळासाहेब जाधव, राजाभाऊ परिट, तानाजी शेळके,पंडित सपकाळ, राम पाटील, मानसिंग पाटील, शिवलिंग शेटे आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here