धाडसी कारवाया करुन त्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी शेकडो ब्रास वाळू जप्त केली. कित्येक वाहने ताब्यात घेतली. लाखो रुपयांचा दंड केला. यामुळे वाळू चोरट्यांना कळायचे बंद झाले होते. अनेकांची पुरती घाबरगुंडी उडाली होती. कारवाईच्या भीतीने अनेकांनी तस्करी बंद केली. तस्करांनी पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात वाळू तस्करी सुरू केली आहे.जत तालुक्यांत रात्री वाळूची चोरटी वाहतूक सुरू झाली आहे. यासाठी महसूलची ‘साथ’ घेतली जात आहे.
नव्याने आलेले प्रांताधिकारी, तहसीलदार,अप्पर तहसीलदार यांची छुपी साथ बरचं काही सांगून जात आहे.परिणामी तालुक्यात वाळू चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. तालुक्यातील बोर नदीपात्र खरडून काढण्याचे काम रात्रभर केले जात आहे. अचकनहळ्ळी, उमदी, मुचंडी, बालगाव, संख, सुसलाद, सोनलगी, हळ्ळी, बेळूडंगी,तिकोंडी,वाळेखिंडी, बागलवाडीं,सिंगऩहळी,डोण परिसर,कुडणूर,अंकले यासह अन्य गावांत वाळू चोरी सुरू आहे.
तसेच कर्नाटकातील विजापूर, अथणी, चडचण व सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, सांगोला येथून उपसा केलेली वाळू सहजपणे जतमध्ये आणली जात आहे. याकडे महसूलचे साफ दुर्लक्ष आहे. दाखविण्यासाठी लुटूपुटूच्या कारवाया केल्या जात आहेत. पोलिस व महसूलमधील कर्मचार्यांचे हात यात गुंतले आहेत.तस्करांचे महसूल व पोलिसांशी लागेबांधे असल्याने कारवाई करण्यापूर्वी त्यांना टीप दिली जात आहे.
दरम्यान 60 ते 80 हजार रुपये चोरी बंद झाल्याने वाळू दर गगनाला भिडले आहेत. सहा महिन्यापूर्वी वाळूचा पाच ते सहा ब्रासचा डंपर 40 ते 50 हजार रुपयांना मिळत होता. आता यात आणखी वाढ झाली आहे. 60 हजारांपासून ते 80 हजार असा सरासरी दर वाढला आहे. यामुळे वाळू माफियांचे उखळ पांढरे झाले आहे. अनेकजण लखपती झाले आहेत.