जत तालुक्यातील या गावातील पैलवानने मिळविले सुवर्ण पदक

0
बिळूर : वाळवा येथे झालेल्या
महाराष्ट्र केसरी सांगली जिल्हा निवड
चाचणी कुस्ती स्पर्धेमध्ये बिळूर गावचा
सुप्रसिद्ध पै.सुनिल रविकुमार कोटगोंड
याने 86 किलो वजन गटांमध्ये माती
विभागात सुवर्ण पदक मिळवून जत
तालुक्याचे नावलौकिक केला आहे.

 

 

 

 

पै. सुनील कोटगोंड हा गंगावेश तालीम
कोल्हापूर येथे वस्ताद विश्वास हरूगले
यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.
जत तालुका तालीम संघाचे खजिनदार
व सोसायटीचे माजी चेअरमन श्रीशैल कोटगोंड यांचा तो पुतण्या आहे.

 

 

जत तालुका तालीम संघाचे अध्यक्ष आणि
सांगली जिल्हा तालीम संघाचे सदस्य
श्रीनिवास भोसले आणि कुस्ती निवेदक
पै.कृष्णा शेंडगे सर यांचे त्याला प्रोत्साहन
मिळाले आहे. पै.सुनिल याची बालेवाडी येथे‌ होणाऱ्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी‌निवड झालेली आहे.त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.