जतेतील गोडावून चोरी | कोट्यावधीच्या मालातून हीच औषधे का चोरली | वाचा सविस्तर

0
3
जत,संकेत टाइम्स : जत शहरात शनिवारी मध्यरात्री धाडसी चोरी झाली आहे, राजे विजयसिंह डफळे दुय्यम आवारातील कृषी सेवा केंद्राचे गोडावून फोडून चोरट्यांनी तब्बल २२ लाख ८८,७४२ लाखाचा मुद्देमाल लंपास केला आहे.याप्रकरणी सत्यवान भिमाशंकर मद्रोवार रा.लक्ष्मी गार्डन,जत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी, जत शहरातील विजापूर-गुहागर महामार्गा लगतच्या बाजार समितीच्या गाळ्यासमोर साईराम कृषी सेवा केंद्राचे मार्केट यार्डातील विस्तारित भागात गोडावन आहे.शनिवारी दुपारी केंद्रांच्या कर्मचाऱ्यांनी हे गोडावून बंद केले होते.मध्यरात्री चोरट्यांनी गोडावूनच्या समोरील भिंतीस भगदाड पाडून आतमध्ये प्रवेश केला.आतून शेटरला लावलेले नट काढून आतील महागडे असलेले विविध औषध कंपन्याचे २२ लाख ८८,७४२ रूपये किंमतीचे ४७ बॉक्स लंपास केल्याचे‌ समोर आले आहे.

यात ६,६,९७२ रूपये किंमतीचे ब्रेनेविया कंपनीच्या औषधाच्या २४० मीलीच्या २५ बॉटलचे १२ बॉक्स,३,७६,७८२ रूपये किंमतीचे ब्रेनेविया औषधाच्या २८० मिलीच्या २० बॉटलचे ८ बॉक्स,१३,४,९८८ रूपये किंमतीच्या औषधाच्या ३०० मीलीच्या २० बॉटलचे २७ बॉक्स अशी औषधे चोरीला गेले आहेत.विशेष म्हणजे पुढील बाजूचे गेट न उघडता दुसऱ्या बाजूने तारेच्या कंपाऊडमधून सर्व बाक्स चोरट्यांनी वाहनात भरल्याचे समोर आले आहे.

 

जत पोलीसाकडून पंचनामा करून तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे शेतीसाठी लागणारी औषधे चोरीला जाण्याची तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे.जत शहरातील मध्यवर्ती ठिकाणी झालेली चोरी पोलीसांना आवाहन ठरली आहे.तासगावचे डिवासएसपी सौ.किर्ती शेंडगे,पो.नि.उदय डुबूल यांनी घटनास्थळी भेट दिली.
दोन फुटाचे भगदाड
चोरट्यांनी शांत डोक्यांनी चोरी केली आहे.प्रांरभी गोडावून इमारतीच्या पुर्व बाजूला दरवाज्या लगत दोन बाय दोन फुटाचे भगदाड पाडले.त्यातून सडपातळ अज्ञात चोरट्यांने आतमध्ये प्रवेश करत दरवाज्याच्या शेटरला लावलेले नटबोल्ट काढले.शेटर उघडून गोडावून मधिल सर्वाधिक महाग असलेले किड रोगावर मारायचे औषधाचे‌ बॉक्स पळविले आहेत.विशेष म्हणजे गोडावूनमध्ये‌ आणखीन सुमारे पाच-सात कोटीची औषधे आहेत.

चोरटे माहितीगार
या चोरीच्या घटनेत गोडावूनमध्ये आतमध्ये जाण्यासाठी पाडलेले नेमक्या ठिकाणचे भगदाड,व आतमधील चोरीस गेलेली महागडी औषधाचेच बॉक्स पळविल्याने चोरटे या औषधाचे व गोडावूनची माहिती असलेले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दुकानदाराचा बेफीकीरपणा
कोट्यावधीचा धंदा करणारे जत शहरातील सर्वच दुकानदार बेफीकीर असल्याचे अनेकवेळा स्पष्ट झाले आहे.येथेही तसेच झाले आहे.सुमारे सात कोटीचा माल असलेल्या गोडावूनच्या शेटरना नटबोल्ट लावण्यात आले आहेत. तर येथे बसविण्यात आलेले सीसीटिव्ही अनेक दिवसापासून बंद पडले आहेत.मुळात कोट्यावधीचा धंदा करताना अशा छूलक गोष्टीकडे दुर्लक्ष करणारे दुकानदार अशा घटनानंतर पोलीसावर आरोप करून मोकळे होतात.मात्र आपल्या मालाची सुरक्षितता ठेवण्याचे त्यांना भान नसते हे पुन्हा स्पष्ट झाले आहे.

डिबी पथकाची गरज
जत शहरात दररोज घरफोडी,दुकान फोडणे,दुचाकी,मोबाईल चोरीसह,गुंडगिरी,दहशत माजविण्याचे प्रकार घडत आहेत.६० हजार लोकसंख्या शहराची आहे.शहरात असे प्रकार रोकण्यासाठी डि बी म्हणून ठाण्याचे एक पथक अशा घटना व कायदा सुव्यवस्था बिघडवण्यावर लक्ष ठेवते.मात्र येथे डिबीचे गतवेळी कर्मचारी बदली झाल्यानंतर पथक बरखास्त केले आहे.त्यामुळे चोरटे,फाळकुट दादा,दहशत करणाऱ्यांचे फावले आहे.

चोरीचे छडा लावण्याचे प्रमाण नगण्य
जत शहरात महिन्यात दहा-बारा घरफोडी,दुचाकी मोबाईल चोरीच्या घटना घडतात.यातील बोटावर मोजण्या ऐवढ्याच पोलीस दप्तरी नोंद होतात.तपास लागत नाहीत म्हणून अनेक नागरिक पोलीसाकडे फिरत नसल्याचे वास्तव आहे. विशेष म्हणजे पोलीसाकडे दाखल झालेले घटनाचे तपास लावण्याचे प्रमाणही नाममात्र आहे.तपासासाठी नेमलेले अधिकारी तपास करण्यापेक्षा मिळकतीच्या इतर गोष्टीत जास्त लक्ष घालतात.त्यामुळे चोरीचे तपास सुरू आहे, यापलिकडे सुधारणा नसतेच.
फोटो ओळी
जत शहरातील मार्केट यार्डातील साईराम कृषी सेवा केंद्राचे गोडावून फोडण्यासाठी चोरट्यांनी भिंतीला पाडलेले भगदाड,चोरी झालेले गोडावून
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here