जत : जतेत महाराष्ट्र राज्य अथेलटिक्स असोसिएशन, सांगली जिल्हा अम्युचअर अथलेटिक असोसिएशन सांगली व विक्रम फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर क्रॉसकंट्री निवड व अजिंक्यपद स्पर्धा 2020/21 चे जत येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 26 डिसेंबर 2021 ला सकाळी 6.30 ला सुरू होणार आहे.
या राज्यस्तर क्रॉसकंट्री निवड व अजिंक्यपद स्पर्धेसाठी कृषि व सहकार मंत्री डॉ विश्वजित कदम,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण सस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार सांळूखे,कस्तुभ गावडे हे उपस्थित राहणार आहेत.ही स्पर्धा यशस्वी संपन्न होण्यासाठी सांगली जिल्हा अम्युचअर अथलेटिक असोसिएशन व विक्रम फौंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य त्याचबरोबर राजे रामराव महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी प्रयत्न करत आहेत.
विक्रम फाऊंडेशनचे अध्यक्ष अँड. युवराज निकम बोलताना म्हणाले की,जतच्या इतिहास क्रॉसकंट्री खेळाची खूप मोठी परंपरा आहे.ती परंपरा ती टिकून राहावी या हेतून कॉग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी राज्यस्तरीय स्पर्धा जत सारख्या ग्रामीण भागात आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील 32 जिल्ह्यातून सुमारे 750 स्पर्धक सहभागी होणार आहेत. जत सारख्या ग्रामीण भागात राज्यस्तरीय स्पर्धा ही पहिल्यांदाच होत आहे,याचा मला अभिमान आहे.