मुंबई : महाराष्ट्रात गेल्या आठ दिवसात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव झपाट्याने वाढताना दिसत असून अशीच रुग्ण संख्या वाढत राहिल्यास राज्यात कडक निर्बंध लावावे लागतील असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देले आहेत.
गेल्या आठवड्यात राजकीय नेतेमंडळीं कोरोनाने विळखा घातला आहे.सरकारमधील 12 मंत्र्यांसह विविध पक्षांतील जवळपास 70 आमदारांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबतची माहिती दिली आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आज मुंबईत होणारी राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठकही रद्द करण्यात आली आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.दररोज रुग्ण संख्या वाढत असल्याने धोका बळावल्याचे चित्र आहे.