कर्नाटक प्रवेश ७२ तासाच्या आतील निगेटिव्ह आरटीपीसीआर अहवाल अट रद्द

0
15
जत : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्यात प्रवेश करण्यासाठी ७२ तासाच्या आतील निगेटिव्ह आरटीपीसीआर अहवाल बंधनकारक करण्यात आला होता.मात्र गेल्या काही दिवसात महाराष्ट्र, कर्नाटक या दोन्ही राज्यात घटती रुग्ण संख्या व कमी झालेला संसर्ग या पार्श्वभूमीवर कर्नाटक शासनाने निगेटिव्ह आरटीपीसीआर अहवालाची सक्ती रद्द केली असून दोन्ही राज्यात आता आंतरराज्य प्रवास करणे सोपे झाले आहे.

मात्र,राज्यात प्रवेश करण्यासाठी लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.कर्नाटक राज्यातील संसर्ग वाढू नये यासाठी सुरुवातीपासूनच राज्य शासनाने खबरदारी घेतली आहे. इतर राज्यातून राज्यात प्रवेश करणाऱ्या सर्वच प्रवाशांसाठी ७२ तासाच्या आतील निगेटिव्ह आरटीपीसीआर अहवाल बंधनकारक करण्यात आला होता. त्याच्या तपासणीसाठी आंतरराज्य सीमेवरती सुसज्ज तपासणी पथके तैनात केली होती.

राज्यात प्रवेश करण्यासाठी अनेक प्रवाशांनी खुष्कीच्या मार्गाचा अवलंब केला. काही प्रवाशांनी बनावट आरटीपीसीआर अहवाल दाखवून राज्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. अशा प्रवाशांना पोलिसांनी शिताफीने पकडून त्यांच्यावर कारवाईही केली.

त्यामुळे लसीचे दोन डोस घेऊन सुद्धा आंतरराज्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कर्नाटक राज्यात जाणे कठीण बनले होते. दोन्ही राज्यातील सीमा भागातील लोकांना एकमेकांवर अवलंबून राहावे लागते. अशा प्रवाशांची अडचण आरटीपीसीआर सक्ती रद्द केल्याने दूर झाली आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here