जत,संकेत टाइम्स : डॉ.नितीन पतंगे (बालरोगतज्ञ ) यांचे माऊली बालरुग्णालय (जत) व लायन्स नॅब नेत्र रुग्णालय (मिरज) व लिटल हार्टस् क्लिनीक (सांगली) यांच्या संयुक्त विद्यमाने रवीवार २७ फेंब्रुवारी २०२२ ला सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत भव्य मोफत नेत्ररोग व बालहृदय रोग,बालआरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती माऊली बालरुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
यात वयोगट-नेत्ररोग तपासणी,सर्व वयोगट बालहृदयरोग व बालरोग,नवजात बालक ते १८ वर्षे या रुग्णाची तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व प्राथमिक औषधोउपचार करण्यात येणार आहेत.
शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती ह.भ.प.तुकाराम बाबा महाराज उपस्थित राहणार आहेत.
शिबीरात नेत्ररोग- मोफत मोतीबिंदू व इतर नेत्ररोग व चष्मा नंबर काढून मिळेल.अत्यल्प सवलतीच्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मा करुन मिळेल.आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा फुले योजना अंतर्गत मोफत नेत्ररोग निदान व शस्त्रक्रिया,लहान मुलांच्या डोळ्यांच्या सर्व समस्या निदान व शस्रक्रिया,तिरळेपणा,दूष्टिदोष, काचबिंदू,मोतीबिंदू,लासरु,पापणी दोष निदान,नेत्ररोपण शस्त्रक्रिया,
बालहृदयरोग- जन्मजात हृदयदोष असणाऱ्या बालकांची तपासणी व उपचार,
शिबीरातील लाभार्थीना 2D ECHO मध्ये ५० टक्के सवलत,बाळांच्या वजनवाढीसाठी औषधोपचार,महात्मा फुले व आयुष्यमान भारत,कर्नाटक आरोग्य योजना व RBSK आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रिया आदी सुविधा उपलब्ध आहेत.
माऊली बालरुग्णालय जत,लायन्स नॅब नेत्र रुग्णालय मिरज,डॉ.श्रीकांत माने (बालहदयरोग तज्ञ)-लिटल हार्टस् क्लिनीक सांगली यांनी या शिबिराचे आयोजन केले आहे.पालकांसह मुलांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.नितिन पंतगे यांनी केले आहे.माऊली बालरुग्णालय,सावंत गल्ली,जत येथे हे शिबिर होणार आहे.