इस्लामपूर : राज्याचे जलसंपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आपण घेत असलेल्या जयंत प्रिमियर लीगची दरवर्षी व्याप्ती वाढत जावून भविष्यात आपल्या लीगचे खेळाडू राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय व प्रो कबड्डी स्पर्धा गाजवितील,असा विश्वास राज्य व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष,युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी व्यक्त केला. स्व.शरद लाहीगडे हरिकन्स कासेगाव विरुध्द स्फुर्ती रॉयल्स जुनेखेड यांच्यामध्ये लीगचा पहिला सामना खेळविण्यात आला.
निनाईनगर (इस्लामपूर) येथील जयंत स्पोर्ट्सच्या वतीने उभारलेल्या स्व.आनंदराव पाटील (मालक) क्रीडा नगरीतील ‘जयंत प्रिमियर कबड्डी लीग’चे श्री पाटील यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. यावेळी युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक,कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके,माजी आमदार दिनकर पाटील,कार्यवाह नितीन शिंदे,माजी जि.प. अध्यक्ष देवराज पाटील, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील,मुख्य संयोजक खंडेराव जाधव (नाना),सौ.रुपाली जाधव,पृथ्वी नाईक शिराळा,विश्वप्रताप नाईक शिराळा,आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू नितीन मदने,रवींद्र कुमावत प्रामुख्याने उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलन व लोकनेते राजारामबापू पाटील,शहीद जवान रोमित चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी गान कोकिळा स्व.लतादीदी मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आले.
प्रतिकदादा पाटील पुढे म्हणाले,वाळवा तालुक्यातील,जिल्ह्यातील कबड्डी व व्हॉली बॉल खेळाला मोठी परंपरा आहे.आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू नितीन मदने,रविंद्र कुमावत यांनी जिल्ह्याला एक ओळख निर्माण करून दिली आहे.भविष्यात या खेळांना अधिक प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न राहील. आपण आयपीएल, प्रो कबड्डीच्या धर्तीवर ८ संघामध्ये सलग दुसऱ्या वर्षी ही स्पर्धा घेत असून या लिग मधून आपल्या भागातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळत आहे. कोणताही खेळ आपल्यातील मतभेद बाजूला करून सर्वाना एकत्र आणत असतो.
विराज नाईक म्हणाले,आपण यावर्षी शिराळा तालुक्यतील खेळाडूंना सहभागी करून घेतले आहे. या लीगची व्याप्ती वाढवित संपूर्ण सांगली जिल्ह्यातील खेळाडूं ना सहभागी करून घेऊ. आयपीएलने क्रिकेट विश्व,तर प्रो कबड्डीने कबड्डीचे विश्व बदलले आहे.रामभाऊ घोडके म्हणाले,या लिगमधून निश्चितपणे जिल्ह्यातील खेळाडूंना प्रेरणा मिळेल. प्रो कबड्डीमधून खेळाडूंना प्रोत्साहन मिळत आहे. राज्य शासनही खेळाडूंना नोकऱ्यासह सुविधा देत आहे.
दिनकरतात्या म्हणाले,खंडेराव जाधव (नाना) यांच्या माध्यमातून सलग दुसऱ्या वर्षी ही लिग होत आहे. खेळाडूंना चांगला मोबदला दिला जात आहे. खेळाडूंनी चांगला खेळ करावा. आम्ही देशात प्रथम ४५ च्या वरील खेळाडूंची स्पर्धा घेतली, त्यास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. यावेळी जयंत स्पोर्ट्सचा राष्ट्रीय खेळाडू शुभम पाटील यांनी खेळाडूंना शपथ दिली.
प्रारंभी स्पर्धेचे मुख्य संयोजक खंडेराव जाधव यांनी प्रास्ताविक भाषणात स्पर्धेचा आढावा मांडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,शहराध्यक्ष शहाजी पाटील,माजी नगराध्यक्ष अँड.चिमन भाऊ डांगे,बाळासाहेब पाटील,अँड.धैर्यशील पाटील,आनंदराव मलगुंडे,रणजित पाटील, हर्षवर्धन पाटील (रेठरेधरण),रोझा किणीकर, सुनीता सपकाळ, संगीता कांबळे,सागर घोडके (सांगली), देवराज देशमुख,अतुल लाहीगडे,पृथ्वीराज पाटील,रवी पाटील,सागर जाधव,संजय पाटील यांच्यासह खेळाडू व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
यावेळी जयंत स्पोर्ट्सचे अध्यक्ष सागर जाधव,विजय देसाई (सोन्याबापू),उमेश रासनकर,सदानंद पाटील,आयुब हवलदार, प्रताप जाधव,फिरोज लांडगे,अंकुश जाधव, अजय थोरात,किरण पाटील,शिवाजी पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत व संयोजन केले. आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू नितीन मदने यांनी आभार मानले. सुरेश पाटील (सांगली),प्रसाद देशपांडे (राजारामनगर) यांनी सूत्रसंचालन केले.
इस्लामपूर येथील जयंत स्पोर्ट्स च्या जयंत प्रिमियर लीगचे उदघाटन करताना प्रतिकदादा पाटील. समवेत विराज नाईक, खंडेराव जाधव,रामभाऊ घोडके,दिनकर तात्या पाटील,नेताजीराव पाटील,बाळासाहेब पाटील,नितीन मदने,सागर जाधव,विजय देसाई व मान्यवर.