नेतृत्व दोन प्रकारची असतात.जशी भगवंताची मुर्ती. मुर्ती अशी असते की,त्यात देवाच्या आकृतीचा भास होतो.म्हणून त्या पाषाणाला मुर्तीपणा प्राप्त होते.तशाच जडणघडणीतील कोणतीही अनुकूल परिस्थिती नसताना सामान्य घरातून आलेल्या एका युवकांने अर्थकरणाची नाडी ओंळखून उभारलेले साम्राज्य पुढे अनेक हातांना बळकंटी देणार ठरले आहे.अशा साम्राज्याचे युंगधर,व्याख्याते,दृष्टे युवा नेते,तडफदार,कृत्तीशील,सर्वस् पर्शी नेतृत्व मा.सचिन निकम यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त…
माडग्याळ या ग्रामीण भागातील गावात सचिन निकम यांचा जन्म झाला.बऱ्यापैंकी समृद्ध असलेल्या कुंटुबातील सचिन निकम यांनी कम्प्यूटर सायन्स मधील घेतली.मुंबई,पुण्यासारख्या शहरात कंपनीमध्ये नोकरी न करता लहान वयातच कुटुंबाकडून मिळालेली समाजसेवेची सवय असल्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून उच्च पदस्थ अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगून अभ्यास करण्यास सुरुवात केली.त्यातूनच सी एम फेलोशिप ची माहिती मिळाली.सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी असल्याने त्यांनी ती फेलोशिप जॉइन केली.
फेलोशिपच्य माध्यमातून आत्ता पर्यंत पुणे जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये तसेच विदर्भातील आदिवासी दुर्गम व कोकणातील रायगड जिल्ह्यातील दुर्गम ग्रामीण भागात काम करून शिक्षण,आरोग्य,कृषी,महीला सबलीकरण,युवक,कुपोषण,पिण्यास स्वच्छ पाणी,रस्ते,घरकुल,पाणी बचत,वृक्ष लागवड,शेती शाळा या अनुंगाने भरीव योगदान दिले आहे.
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना पदवीधर संघटनेचे संस्थापक सुजितभाऊ थिटे यांनी पदवीधर संघटनेमध्ये काम करण्याची संधी दिली.सुरवातीला संघटनेचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून काम केले.त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्य पातळीवर कार्याध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली.त्या मिळालेल्या संधीतून सचिन निकम यांनी युवकांचे प्रश्न सोडवणे,संघटनेत काम करत असलेल्या युवकांना नेतृत्व प्रशिक्षण देणे.शासन दरबारी युवकांचे प्रश्न मांडण्याचे काम करत आहेत.
युवक नेतृत्व,प्रभवशाली वक्तृत्व,उत्तम कर्तुत्व यांचा संगम म्हणजे सचिन निकम यांच्याकडे पाहिले जात आहे.देशात सध्या युवकांची राजकीय क्षेत्र गरज आहे.सचिन निकम सारखे उच्चशिक्षित,तरूण उमेदवार येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकात उमेदवार असतील हे निश्चित आहे.सध्या सचिन निकम हे समाजसेवेत अनेक तप काम करणाऱ्या निकम परिवारातून येतात.मोठा राजकीय वारसाही त्याच्या कुंटुबियांना आहे.
त्यामुळे नुकत्याच येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत ते माडग्याळ या नव्याने होत असलेल्या जिल्हा परिषद मतदार संघातून मैदानात यावेत असे या वाढदिनी अपेक्षा आहेत.समाजहित व जनतेची मोठी तळमळ असणाऱ्या सचिन निकम सर वाढिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..!
शंब्दाकन : रमेश चौगले,माडग्याळ