माधवनगर : हलगीचा कडकडाट घुमायला लागला. लेझीमच्या तालावर माणसं नाचायला लागली. कडक उन्हात अंगातून घाम येईपर्यंत लेझीमचे डावावर डाव रंगत गेले आणि ही लेझीमची अनोखी स्पर्धा अतिशय जल्लोषात पार पडली.
शांतिनिकेतन लोकविद्यापीठाच्या हिरव्यागार परिसरात लोकोत्सवाचा शुभारंभ झाला असून यानिमीत्त आयोजित केलेल्या लेझी स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संघ आवर्जुन या स्पर्धेत सहभागी झाले होते. स्पर्धेचे उदघाटन राजापुरचे उद्योजक अविनाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वेदांत पाटील, विद्या गोवनकर, नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील आदी उपस्थित होते. सकाळी सुरु झालेली ही स्पर्धा संध्याकाळपर्यंत सुरु होती.
परीक्षक म्हणून बाळासाहेब नदाफ, रामदास गुरव, तुकाराम लिंगले यांनी जबाबदारी पार पाडली. स्वागत व प्रास्ताविक महेश पाटील यांनी केले. आभार मोहन कोळेकर यांनी मानले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-
प्रथम- मौनी महाराज पथक (मुली) बाळेघोल
द्वितीय- गिरीगर्जना पथक पोहाळे
तृतिय- दामाणी हायस्कुल सांगली
उत्तेजनार्थ अमर लेझीम पथक सोनी
हनुमान लेझीम पथक हिवतड, कुरूंदवाड लेझीम पथक, मौनी महाराज पथक बाळेघोल