मारहाणीत गुंडा ऊर्फ मदगोंड बगली, संतोष राजकुमार माळी यांच्या पोटावर, अंगावर धारदार शस्त्राचे वार झाले होते. प्रकाश परगोंड जखमी झाले. तिघांना सोलापूरला उपचारासाठी हलवले. दोघांचा वाटेत मृत्यू झाला. जखमी परगोंडला सोलापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
हर्षवर्धन अनिल देशमुख, संदीप तुकाराम भोसले, अक्षय रामचंद्र भिसे, संजय उरफ मल्लिकार्जुन शामराव शिंदे, इंद्रजित यशवंत वाघ, विकास मनोहर भिसे, तेजस्व ऊर्फ यल्लाप्पा गंडाप्पा साळुंखे, मारुती सोमनिंग माळी ( रा. सर्व उमदी), विकास बिराप्पा गुळदगड (वय २४ कुलाळवाडी, ता. जत) या नऊ संशयित आरोपीना पंढरपूर येथे पकडले. त्यांच्याकडून गुन्हात वापरलेल्या तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. संशयित आरोपीची चौकशी केली असता खुनाच्या गुन्ह्याची कबुली दिली.
गुरुवारी जत येथील न्यायालयात हजर केले असता संशयित आरोपीना १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुुुनावली आहे.आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली हत्यारे, दुचाकी गाडी, अजून यात कोण सहभागी आहे, खुनाचे नेमके कारण काय, याचा तपास करायचा आहे. अधिक तपास उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले करीत आहेत.