“थोडे तरी शुद्धीवर या!”

0
7

आता तरी थोडे शुद्धीवर या ! असे म्हणण्याची वेळ खरच आली आहे. सर्वत्र कोरोना महामारी पसरली असताना स्वतःच्या स्वार्थासाठी , पैश्याच्या लोभापाई ज्या गोष्टी घडत होत्या .ते बघून मानव जाती या संकट काळात, हि पशू बनली आहे की काय असे वाटत होते. कोविड उपचारासाठी उपयोगी पडणारे प्राण रक्षक औषध मनमानी पद्धतीने विकल्या गेल्या, इतकेच नव्हे तर रेमदिसेविर या इंजेक्शन च्या रिकाम्या बाटल्या मध्ये प्यारासितामोलचे पाणी करून भरून विकण्यात आले. किती अमानवी प्रकार हा?. काही खाजगी रुग्णालयात खाटा उपलब्ध असताना सुद्धा अधिक श्रीमंत, धनी लोकांना पैश्याच्या जोरावर वितरित करण्यात आली. कोरोनासाठी उपयोगी पडणारे अँटी व्हायरस गोळी बाजारातून अचानक अदृश्य झाली .नक्कीच ती गोळी अधिक दराने विकल्या जात असणार. स्मशान भूमी मध्ये प्रेत जाळण्यासाठी लागलेली रांग बघून कुणाचेही मन हेलावून जाईल ,मात्र तेथेही टाळू वरचे लोणी खाणारे लोक आहेतच .अधिक सोयी देण्याच्या नावाखाली तेथेही लुटमार करण्याचा प्रकार घडलाच. कोरोना नष्ट करणारे चूर्ण निर्माण करण्याचा दावा करून रुग्णाची लूट सुरू आहे.
लोकांची सेवा करण्याच्या नावाखाली केवळ आणि केवळ लुटमार आणि अमानवी प्रकार सुरू आहेत.आज मानवी जीवन धोक्यात आहे. सर्वं भारतीय नागरिकांचे आद्य कर्तव्य आहे की या संकट काळात एकत्र येऊन या गंभीर संकटाचा मुकाबला करण्यासाठी तयार असणे. स्वार्था साठी लोकांच्या जीवाशी खेळणारे लोक हे विसरत आहेत की जर त्यांनाच रुग्णालयात खाटा उपलब्ध झाली नाही, प्राण रक्षक औषध मिळाली नाही, प्राण वायू मिळाला नाही किंवा रुग्ण वाहिका वेळेवर उपलब्धच झाली नाही तर मग त्याचे काय  हाल होतील? लोकांनी खरच शुद्धीवर यावे .आणि असले सर्व गैर प्रकार आतातरी बंद करावे. ती वेळ देशावरील एक संकटाचा भाग समजून काही चांगले करून दाखवण्याची होती. यात सर्वांनी मिळून  जगासमोर एक चांगले उदाहरण प्रस्तुत करण्याची वेळ होती.   कोरोणा विषानुच्या अती तीव्र दोन लाटा आणि त्या पेक्षा थोडी सौम्य तिसऱ्या लाटेचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सर्वांना तडाखा बसला आहेच. कुणीच यातून सुटलेले नाही. तिसरी लाट पूर्णपने ओसरली आहे ,याचा दिलासा सर्वाना मिळाला आहे.

 

 

सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. तिन्ही लाटांच्या वेळी जेव्हा नागरिकांचा जीव धोक्यात आहे असे कळले तेव्हा सर्व लोक असे म्हणायचे की आम्हाला यातून वाचवा, आम्ही या नंतर छान प्रेमाने वागू, सभ्यतेने वागू, भांडणे नष्ट करू, गरिबांना नेहमी मदत करू, इतरांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य करणार नाही, लबाडी करणार नाही,पर -जीवांचे महत्व समजावून घेवू, व्यसनं सोडून देईल , समाज उपयोगी कार्यात स्वतःला प्रामाणिक पने वाहून घेईल,चांगल्या कार्याची सुरुवात करू .नागरिक तिन्ही लाटेमध्ये देवाजवळ किव्वा आपल्या आप्त स्वकियांकडे कोरोनातून वाचलो तर आम्ही असे करू ,तसे करू ,

 

 

 

याची सुरुवात करू , त्यांची सुरुवात करू अशी याचिका करताना दिसायचे.जर विषाणूच्या लाटा थंडावल्या आहेत, तर  तिन्ही लाटांच्या वेळी केलेली याचिका किंवा केलेला चांगला विचार, सुरू करायला आता कोणत्या मुहूर्ताची वाट बघत आहोत.

डॉ हर्षवर्धन कांबळे.
हनुमान नगर.
नागपूर.२४ ( ९८२२५९३७५७,)

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here