जत,संकेत टाइम्स : तालुक्यातील उमदी येथील मलकारसिध्द यात्रेस सोमवार, ४ एप्रिलपासून प्रारंभ होणार असल्याची माहिती यात्रा कमिटीच्या अध्यक्षा संगीता सावंत यांनी दिली.कोरोनामुळे दोन वर्षे यात्रा होऊ शकली नाही. परंतु कोरोनाचे निर्बंध हटविल्याने आता ही यात्रा होणार आहे.
जनावर बाजारासाठी ही यात्रा प्रसिध्द असून सुमारे दहा कोटी रुपयांची उलाढाल जनावरांच्या खरेदी-विक्रीतून होत असल्याचे सांगण्यात आले.धार्मिक कार्यक्रमाबरोबरच कन्नड नाटक पालखी भेटीचा सोहळा बैलगाडी शर्यत व जंगी कुस्त्याही होणार असल्याचे यात्रा कमिटीच्या उपाध्यक्षा रेश्मा जकाते यांनी सांगितले.