भिवर्गी घराचे आगीत मोठे नुकसान,उपसंरपच बसवराज चौगुले यांची तात्काळ मदत

0
6
भिवर्गी(रमेश चौगुले) : भिवर्गी ता.जत येथील श्रीमती इटाबाई लक्ष्मण सुसलाद यांच्या घराला अचानक आग लागल्याने संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.त्यांना उपसंरपच बसवराज चौगुले यांनी तात्काळ मदत म्हणून रोख २ हजार रूपये देत माणूसकी जपली आहे.

 

आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या इटाबाई सुसलाद यांच्या राहत्या घरास अचानक आग लागली होती.त्यात घरातील संसार उपयोगी साहित्य,धान्ये, रोख रक्कम जळून खाक झाले  आहेत.

 

त्यात त्यांचे कुंटुबिय उघड्यावर आले आहे.यांची माहिती मिळताच उपसंरपच बसवराज चौगुले यांनी घटनास्थळी भेट देत तात्काळ २ हजार रूपये रोख रक्कमेची मदत दिली आहे.

 

 

मानवता हाच खरा धर्म आहे आणि एकमेकांना मदत करणे हे माणसाचे माणुसकीच्या नात्याने खरे कर्तव्य आहे. माणसाने जीवन जगत असताना त्याला शक्य होईल तेवढी मदत इतरांना संकटाच्या वेळी करत राहिले पाहिजे.सुसलाद कुंटुबियांना दानसुर लोकांनी मदत करावी,असे आवाहनही चौगुले यांनी केले आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here