उमदी यात्रेतील प्रदर्शनात बैलाचा मृत्यू

0
उमदी,संकेत टाइम्स : उमदी ता.जत येथील यात्रेत जनावरे प्रदर्शनात आणलेल्या खिलावर खोंडाचा अचानक मृत्यू झाला आहे.धर्मू मेडीदार रा.कागनरी असे बैल मालकाचे नाव आहे.

 

 

उमदी येथील श्री मलकारसिंध्द देवाची यात्रा सुरू आहे. तेथे यात्रेनिमित्त जनावरे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रदर्शनात अनेक जनावरे आली आहेत.कागनरी येथील ऊसतोड मजूर धर्मू मेडीदार यांचाही बैल प्रदर्शनात आला होता.

 

त्यांनी ऊसतोडीची उचल घेऊन गेल्या महिन्यात
कर्नाटकातून दोन लाख रूपयाला हा खिलार खोंड खरेदी केला होता.प्रदर्शनात खोंड लक्ष वेधून घेत होता.त्याला अनेक शेतकऱ्यांची मागणीही येत होती.मात्र अचानक सोमवारी हा बैल मृत झाल्याने मेडिदार कुंटुबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.रात्रन् दिवस ऊसतोड करून मेंडिदार व त्यांच्या मुलांने हा खोंड विकत घेतला होता.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच उमदी ग्रामपंचायत व यात्रा कमिटीचे प्रमुख निवृत्ती शिंदे यांनी तात्काळ वीस हजार रूपयाची मदत दिली आहे.

 

तर यात्रेत उपस्थित अनेक यात्रेकरू शेतकऱ्यांनीही मेडिदार यांना मदत केली आहे.मेडिदार यांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांना दानशूर शेतकऱ्यांनी मदत करावी,असे आवाहनही शिंदे यांनी केली आहे.
ऊसतोड मजूर धर्मू मेडिदार यांना तात्काळ वीस हजाराची मदत देताना निवृत्ती शिंदे व यात्रा कमिटी पदाधिकारी व सदस्य
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.