विक्रम.. | जत शहरातील या पतसंस्थेला एका आर्थिक वर्षात १ कोटी १ लाख ढोबळ नफा | सभासदांना १० टक्के डिंव्हींडचेही वाटप

0
4

जत,संकेत टाइम्स : जत शहरातील नामांकित गणेश व्यापारी पतसंस्थेला सन २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये १ कोटी १ लाख रुपयांचा ढोबळ नफा झाला असून संस्था अ वर्ग कायम असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन मल्लिकार्जुन इटंगी यांनी पत्रकार बैठकीत दिली. चेअरमन इटंगी म्हणाले,जत शहरातील व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या आमच्या संस्थेचा व्यवसायाचा चढता आलेख कायम ठेवला.

 

नुकत्याच संपन्न झालेल्या आर्थिक वर्षात संस्थेने आपल्या लौकिकाप्रमाणे तब्बल १ कोटी १ लाख ढोबळ नफा मिळविला आहे.संस्थेचा ३१ मार्च २०२२ अखेर रूपये २३ कोटी रुपयांचा एकूण व्यवसाय झाला आहे. एकूण ठेवीमध्ये
तब्बल २ कोटींनी वाढ होऊन, ३१ मार्च २०२२ अखेर एकूण ठेवी रूपये ११ कोटी १९ लाख इतक्या झाल्या आहेत. ठेवी वाढण्याचे प्रमाण २२ टक्के इतके आहे.संस्थेने ११ कोटी ११ लाख
कर्ज वाटप केले आहे.संस्थेचे वसूल भागभांडवल ६० लाख रूपये इतके असून, राखीव व इतर सर्व निधी ४ कोटी ९३ लाख आहे.

 

एकूण गुंतवणूक ४ कोटी ९१ लाख इतकी केलेली आहे. संस्थेच्या पोटनियमा नुसार कराव्या लागणाऱ्या सर्व तरतुदी व इतर सर्व खर्च वजा जाता शिल्लक निव्वळ नफा रुपये ५६ लाख २४ हजार इतका झाला असून, चालू वर्षी संस्थेला थकीत कर्जाची वसुली चांगली झाल्यामुळे एन पी ए शून्य टक्के राखण्यात यश आले आहे. पतसंस्थेचे स्वमालकीची जत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य दिव्य अशी स्वतःची इमारत आणि स्वतःचे स्ट्राँग रूम व लॉकर सुविधा आहे. संस्थेमध्ये इतर बँके प्रमाणे, सीबीएस सॉफ्टवेअर सिस्टीम चालू करून सभासदांना आणि ग्राहकांना कमीत कमी वेळेत खात्यावरील रक्कम एका ठिकाणाहून दुसरीकडे देशात कुठेही, पैसे पाठवणेची सोय व्हावी याकरिता आर टी जीएस व एन ई एफ टी सुविधा चालु केली आहे.

 

तसेच सभासदांना प्रती वर्षी १० टक्के प्रमाणे डिव्हीडंड दिलेला असून, संस्थेला प्रत्येक वर्षी सतत ऑडिट वर्ग “अ ” मिळालेला आहे. जागतिक पातळीवर कोरोनामुळे संपूर्ण देशात आर्थिक संकट निर्माण झाले असताना देखील संस्थेने गत लॉकडाऊन, व जागतिक मंदीच्या काळातही आपल्या सभासदांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.संस्थेचे संचालक मंडळ व कर्मचारी यांनी ग्राहकांना कमीत कमी वेळेत संस्थेच्या व्यवहाराच्या खास करून सोने गहाण कर्ज कमीत कमी व्याज दराने देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

 

 

संस्थेचे चेअरमन व संचालक मंडळ आणि कर्मचारी यांनी खर्चामध्ये बचत, काटकसर, प्रामाणिक व पारदर्शक कामकाज करून संस्थेला उच्च शिखरावर विराजमान करण्याचं प्रयत्न करीत आहेत.यावेळी संस्थेचे सभासद व हितचिंतक, कर्जदार सर्वांनी चांगले सहकार्य केल्याने, व्यवसाय आणि विक्रमी नफा झाला आहे. यापुढे ही पतसंस्थेच्या माध्यमातून कमीत कमी वेळेत, कमी व्याज दराने कर्ज पुरवठा व  अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून चांगल्या सुविधा उपलब्ध करून जत तालुक्यात नावलौकिक करेल,असा विश्वास यावेळी इंटगी यांनी व्यक्त केला.

यावेळी संस्थेचे चेअरमन, श्री.मल्लिकार्जुन इटंगी , बसवराज हिट्टी, मोहन माळकोटगी, चंद्रशेखर संख, बसवलिंग कल्याणी, शैलेश ऐनापुरे, सागर बामणे, महादेवी का ळगी, सुलोचना हत्ती, वर्षाताई संकपाळ, व्यवस्थापक सुनील जेऊर,  आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here