जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील उंटवाडी येथे राहुल मल्लाप्पा व्हटीहटटी (वय १८,सध्या रा. रामपूर मुळ रा. तिकोटा जि.विजापूर) यांने उंटवाडी येथे अलगोंडा आप्पासाहेब तुळजानावर यांच्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी उंटवाडीचे
सरपंच बंडू शंकर फडतरे यांनी जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.प्राथमिक तपास हवालदार विजय वीर करीत आहेत.