अखेर ठरलं ! सरपंच, नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून होणार

0
2
मुंबई: राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारची आज बैठक पार पडली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. यातील महत्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची तसेच नगरपंचायत नगराध्यक्षाची थेट जनतेमधून निवड होणार आहे. 
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा करून राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची थेट जनतेमधून निवड केली जाणार आहे. सरपंच पदाबरोबरच नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेण्यात येणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

विशेष बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारनं थेट सरपंचपदाच्या निवडणुकीचा निर्णय घेतला होता. तो निर्णय उद्धव ठाकरे सरकारनं रद्द केला होता. पण आता शिंदे आणि फडणवीस सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीने रद्द केला निर्णय पुन्हा एकदा बदला आहे. एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here