फॅबटेक अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनींची इन्फोसिस या नामांकित कंपनीमध्ये निवड

0

 

सांगोला, संकेत टाइम्स : फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील पूजा गायकवाड या विद्यार्थिनींची इन्फोसिस या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली असून त्यांचे वार्षिक पॅकेज ३.६ इतके आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. आर बी शेंडगे यांनी दिली. इन्फोसिस  ही एक भारतीय मल्टिनॅशनल  माहिती तंत्रज्ञान कंपनी आहे, जी व्यवसाय सल्ला, माहिती तंत्रज्ञान आणि आउटसोर्सिंग सेवा प्रदान करते.या  कंपनीची स्थापना पुण्यात झाली असून तिचे  मुख्यालय बंगळुरू येथे आहे. इन्फोसिस २०२० च्या कमाईच्या आकडेवारीनुसार टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनंतर दुसरी सर्वात मोठी भारतीय आयटी कंपनी आहे अशी माहिती इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागाच्या  विभाग प्रमुख प्रा. धनश्री राऊत यांनी दिली. इन्फोसिस हि प्रॉडक्ट बेस्ड कंपनी आहे.

 

 

या निवड झालेल्या विद्यार्थिनीचे  संस्थेचे चेअरमन श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी संस्थेचे  मॅनेजिंग डायरेक्टर श्री अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री संजय अदाटे, अकॅडमिक डीन प्रा.टी एन जगताप,डीन क्वालीटी अशुरन्स प्रा. डाॅ. एन. जी. नार्वे ट्रैनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा संगणगौडर, टीपीओ को-ओर्डीनेटर प्रा. दर्शना खंदारे,सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक यांनीही अभिनंदन करून पुढील कारकीर्दीस  शुभेच्छा दिल्या.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.