कवटेमहाकांळ : महाराष्ट्र परिचर्या परिषद अर्थात महाराष्ट्र नर्सिंग कौन्सीलच्या राज्याध्यक्ष पदी कवटेमहाकांळचे सुपुत्र डॉ.रामलिंग माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्यातील नर्सिंग क्षेत्राचे नियमन आणि नियंत्रक करणारी शासनाची संस्था १९६६ पासून सविधानिक स्वायत्त संस्था कार्यरत आहे. या संस्थेकडे १,७५,००० परिचारीका नोंदणीकृत असून आरोग्य क्षेत्रात नर्सिंग कौन्सिलचे अनन्य साधारण महत्व आहे.या नर्सिंग कौन्सिलची सर्वसाधारण निवडणूक राज्य शासनाने जुन ते डिसेंबर २०२१ या कालावधीत पार पाडली या निवडणुकीद्वारे शासनाने निवडून आलेले आणि ५ नामनिर्देशीत सदस्य अधिसुचना २९ जुन २०२२ रोजी निर्गमित केलेनंतर ४ जूलै २०२० रोजी परिषदेतर्फे अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणीसाठी ५ ऑगष्ट २०२२ रोजी सर्वसाधारण सभा नियोजीत केली होती. या सभेत पुढील पाच वर्षासाठी डॉ.रामलिंग माळी अध्यक्षपदी व श्री. अरुण कदम यांची उपाध्यक्ष पदी बिनविरोध उपस्थित सदस्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे या परिषदेसाठी श्रीमती. प्राची धारप, अर्थ समिती श्रीमती.मनिष शिंदे, व्हिजिलन्स समिती, डॉ. महादेव शिंदे, शैक्षणिक / नोंदणी समिती चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आहे. तसेच सर्व समिती सदस्यांची निवड होऊन सर्व समावेशक परिषद गठीत करण्यात आली.
आजादी का अमृत महोत्सवानिमित्त परिचारीका संवर्गाकडून अभिनंदन व उत्साहाचे वातावरण दिसून येते.यानिमित्ताने महाराष्ट्रातील सर्व नर्सेसच्या संघटना व डॉ. बाळासाहेब पवार अध्यक्ष व राज्यस्तरीय पदाधिकारी व सभासद महाराष्ट्र राज्य खाजगी नर्सिंग स्कूल व कॉलेज मॅनेजमेंट असोसिएशन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.