सांगली : राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १८ नवनियुक्त मंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अनेक मान्यवरा उपस्थित होते. या मंत्रिमंडळ विस्तारात सांगली जिल्ह्यातील मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. सुरेश खाडे यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. मंत्री डॉ. सुरेश खाडे यांचा परिचय पुढीलप्रमाणे.
1 जून, 1958. मु.पो. पेड, तालुका-तासगाव, जिल्हा-सांगली
शिक्षण
अभियांत्रिकी (वेल्डिंग) डिप्लोमा (सिल्व्हर मेडल प्राप्त), डी. लिट. (श्रीलंकेतील आंतरराष्ट्रीय कोलंबो युनिव्हर्सिटीने उत्कृष्ट समाजसेवेबद्दल पदवी प्रदान केली.)
ज्ञातभाषा
मराठी, हिंदी व इंग्रजी.
वैवाहिकमाहिती
विवाहित, पत्नी श्रीमती सुमन.
अपत्ये
एकूण- 2 (दोन मुलगे).
व्यवसाय
शेती व उद्योग.
पक्ष
भारतीय जनता पक्ष.
मतदारसंघ
281- मिरज (अनुसूचित जाती), जिल्हा-सांगली.
इतरमाहिती
संस्थापक-अध्यक्ष, दास बहुउद्देशीय शिक्षण संस्था, या संस्थेमार्फत मिरज येथे आमदार सुरेश (भाऊ) खाडे इंग्लिश मेडियम स्कुल सुरु केले; आय.ए.एस. व आय.पी.एस.च्या विद्यार्थ्यांना पुस्तके व आर्थिक मदत; अनेक शैक्षणिक संस्थांना संगणक संच दिले; गरीब होतकरु विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप; जत साखर कारखान्याच्या माध्यमातून दुष्काळात चारा छावणी सुरु केली; अनेक गावात स्वखर्चाने बोअरवेल बसविल्या; टँकरने पाणीपुरवठा केला; जत तालुक्यातील इंदिरा आवास योजनेंतर्गत अपूर्ण घरांसाठी स्वखर्चाने साहित्य पुरविले; शहिद जवानांच्या कुटुंबियांना अर्थसहाय्याद्वारे वैयक्तिक मदत केली; 2010-2013 सांगली जिल्हा अध्यक्ष (ग्रामीण), 2013-2015 महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष; पुरपरिस्थितीत पुरग्रस्तांना तसेच गरीब व निराधार महिलांना संसारोपयोगी साहित्य दिले; जळीतग्रस्तांना मदत; नैसर्गिक आपदग्रस्तांना मदत; दीन, दलित अपंगांना तसेच गरीब रुग्णांना औषधोपचारासाठी मदत; संचालक, राजे विजयसिंह डफळे सहकारी साखर कारखाना लि. जत; संस्थापक-अध्यक्ष, सुरेश (भाऊ) खाडे वाहतूक सहकारी संस्था जत, जिल्हा सांगली; संस्थापक-अध्यक्ष, जत तालुका रहिवाशी संघ मुंबई; संस्थापक-चेअरमन, सुरेश (भाऊ) खाडे नागरी सहकारी पतसंस्था मर्या, मुंबई; 1999-2003 जतच्या दुष्काळी भागाला म्हैसाळ योजनेच्या सहाव्या टप्प्याचे कृष्णा नदीचे पाणी मिळावे यासाठी अनेक वेळा धरणे, मोर्चे व आंदोलने केली; भूमी संपादनाबद्दल शेतकऱ्यांना भरपाई मिळवून दिली; रस्त्यांचा बॅकलॉग भरुन काढला; जत तालुक्याचे विभाजन करुन नवीन उमदी तालुका करावायासाठीच्या आंदोलनाचे नेतृत्व; आश्रमशाळा विकासासाठी प्रयत्न; जत येथे जागतिक बँकेच्या सहाय्याने उपजिल्हा रुग्णालय व्हावे यासाठी प्रयत्न; जत तालुक्यातील अनेक शैक्षणिक संस्थांना व व्यायामशाळांना आर्थिक मदत; मुकबधिर विद्यालयास मदत; ग्लुकोज मका प्रक्रिया सहकारी उद्योग उभारणीसाठी प्रयत्न; मिरज तालुक्याच्या दुष्काळी भागाला म्हैसाळ योजनेचे पाणी मिळावे यासाठी प्रयत्न; मिरज तालुक्यात अनेक ठिकाणी समाज मंदिरे बांधली; अनेक मंदिरांच्या बांधकामासाठी मदत; बेळंकी येथील सिद्धेश्वर मंदिरात अन्नछत्र बांधून दिले; तालुक्यात अनेक गावात बुद्ध मंदिरे उभी केली. मिरज तालुक्यातील रस्त्यांचा अनुशेष भरुन काढला, बेळंकी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीसाठी 15 कोटी निधी मंजुरीसाठी विशेष प्रयत्न; अनेक गावांच्या विकासासाठी भरीव निधी मिळवुन दिला; मिरज तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष योगदान; 2004-2009, 2009-2014, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; सदस्य, अंदाज समिती, पंचायतराज समिती, अनुसूचित जाती कल्याण समिती व उपविधान समिती; 2015 ते 2019 अनुसूचित जाती कल्याण समितीचे समिती प्रमुख; जून, 2019 ते ऑक्टोबर, 2019 सामाजिक न्याय व मदत सहाय्य खात्याचे मंत्री; ऑक्टोबर, 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड. दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी मंत्रीपदाची शपथ.