जंगलात नेऊन अत्याचार अन् हत्या | तक्रारीच्या भीतीने प्रेयसीला संपवले

0
335

इंस्टाग्रामवरुन ओळख झालेल्या युवकाचे उमरेडमधील एका तरुणीशी प्रेमसंबंध जुळले. त्याने फिरायला नेण्याच्या बहाण्याने जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. प्रियकराच्या या कृत्यामुळे प्रेयसीला धक्का बसला. तिने पोलिस ठाण्यात तक्रार देण्याची धमकी प्रियकराला दिली. त्यामुळे त्याने प्रेयसीचा ओढणीने गळा आवळून खून केला.

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याने बलात्काराचा गुन्हा दाखल होण्याच्या भीतीमुळे प्रेयसीचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. लोकेश जुगनाके (३०, रा. अड्याळ) असे आरोपी युवकाचे नाव आहे. आई व भावासह २२ वर्षाची पिडिता राहत होती. ती बीए पदवीच्या द्वितीय वर्षाला शिकत होती. तिचे इंस्टाग्रामवरुन लोकेश जुगनाके या युवकाशी सूत जुळले. दोघांचाही इंस्टाग्रामवरुन नेहमी संपर्क होत होता. गेल्या वर्षभरापासून दोघांचेही प्रेमसंबंध होते. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवले होते.

पूजानेही त्याला लग्नास होकार दिला होता. पूजाने आपल्या आईशी त्याची ओळख करुन दिली. लोकेशने तिच्या आईलाकडेही पूजासोबत लग्न करण्याची इच्छा बोलून दाखवली. गेल्या काही दिवसांपासून लोकेश हा पूजाला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी बळजबरी करीत होती. मात्र, पूजाने वारंवार नकार देत होती.

जंगलात नेऊन केला बलात्कारः घराकडे जात असताना लोकेशने एमआयडीसी रस्त्यावर दुचाकी थांबवली. यावेळी लोकेशच्या मनात काहीतरी वेगळेच होते. त्याने महामार्गावरील एका जंगलात नेले. तेथे तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने नकार दिला. त्यामुळे लोकेशने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकारामुळे पिडितेला संताप आला. तेथेच दोघांचा वाद झाला. तिने उमरेडला पोहचल्यानंतर थेट पोलीस ठाण्यात जाऊन बलात्कार केल्याची तक्रार देणार असल्याचे लोकेशला सांगितले. त्यामुळे लोकेश घाबरला.

प्रेयसीचा ओढनीने आवळला गळाः मैत्रणीच्या तक्रारीवरुन पोलीस बलात्काराचा गुन्हा दाखल करतील आणि अटकसुद्धा करतील, अशी भीती लोकेशला होती. त्यामुळे त्याने गुन्हा दाखल होण्याच्या भीतीमुळे तिचा ओढणीने गळा आवळून खून केला. सोमवारी सकाळी खून झाल्याची घटना उघडकीस आली.पिडितेच्या हातावर’लोकेशने माझा बलात्कार केला.’ असे लिहलेले आढळले. ठाणेदार धनाजी जळक यांनी गुन्हा दाखल करून चंद्रपुरातून लोकेशला अटक केली.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here