– ९० वर्षाच्या वृध्देच्या दिवाणी प्रकरणातही यशस्वी तडजोड
सांगली : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार सांगली जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. जिल्हयातील प्रलंबित प्रकरणे, दावापूर्व प्रकरणे, स्पेशल ड्राईव्ह मध्ये, ट्राफिक ई चलन प्रकरणे ४८७४ अशी एकूण ७२०२ प्रकरणे निकाली करण्यात आली. न्यायालयातील दिवाणी व फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे तसेच राष्ट्रीयकृत बॅंका व इतर वसुलीची प्रकरणे तसेच सहकार, कामगार, औद्योगिक, ग्रा
सदर लोकन्यायालयाचे आयोजन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. अजेय राजंदेकर, , सांगली यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करणेत आले.
या दिवशी न्यायमूर्ती संदीप शिंदे व न्यायमूर्ती अभय आहुजा, न्यायमूर्ती, उच्च न्यायालय, मुंबई व पालक न्यायमूर्ती, सांगली जिल्हा यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी मोटार अपघात दावा प्राधिकरणाच्या पॅनेलच्या ठिकाणी उपस्थित राहून, पॅनेल संदस्यासोबत इंन्शुरन्स कंपनी व संबंधीत अर्जदार यांच्यामध्ये तडजोडीचा यशस्वी प्रयत्न केला. संबंधीत अर्जदार यांना इन्शुरन्श कंपनीकडून न्यायमूर्ती उच्च न्यायालय, मुंबई यांचेहस्ते ठरलेल्या रक्कमेचा धनादेश व पुष्पगुच्छ देण्यात आले. तसेच कौटुंबिक न्यायालयामध्ये चार वैवाहिक प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड करून व त्यांना सुखाने संसार करण्याकरीता शुभेच्छा देवून गौरविण्यात आले. ९० वर्षाच्या वृध्देचे दिवाणी प्रकरणही यशस्वीपणे तडजोड करण्यात आली.
सदरच्या लोकअदालती दिवशी जिल्हा न्यायाधीश आर. के. मलाबादे व इतर न्यायीक अधिकारी उपस्थित होते. लोकअदालत यशस्वीरित्या पार पाडण्याकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सांगलीचे सचिव प्रविण कि. नरडेले, यांनी उपस्थित सर्व मान्यवर अतिथी, न्यायिक अधिकारी, सरकारी वकील, वकील बारचे अध्यक्ष व सदस्य या सर्वाचे आभार मानले. या लोकअदालतीचे नियोजन जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक व्ही.व्ही. कुलकर्णी, अधिक्षक शुभदा कुलकर्णी, सहाय्यक सचिन नागणे व नितीन आंबेकर यांनी केले. लोकअदालतीस पक्षकारांचा सहभाग मोठया प्रमाणामध्ये होता.