स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, विनायक मेटे यांच्या घटनांमध्ये एकच साम्य ; संतोष पाटील

0
6
सांगली : स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर दिल्लीत झालेली एक्सीडेंट घटना ही पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान घडलेली घटना होती. त्यावेळेला  त्यांच्या गाडीत तिघेजण होते त्यामध्ये त्यांचा ड्रायव्हर, सेक्रेटरी व स्वतः गोपीनाथ मुंडे होते.त्याच पद्धतीने मराठा समाजाचे व शिवसंग्राम चे अध्यक्ष स्वर्गीय विनायक मेटे यांच्या बरोबर घडलेली घटना ही पहाटे चार ते पाचच्या दरम्यान घडली होती. आणि त्या वेळेला ही त्यांच्या बरोबर गाडीमध्ये तीघे जणच होते, यामध्ये त्यांचा ड्रायव्हर, गार्ड व स्वतः विनायक मेटे या दोन्ही घटनां मध्ये सर्व गोष्टी साम्य आहे.

 

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर ही जी घटना घडली आणि त्या वेळेला ही दबक्या आवाजात चर्चा होती की स्वर्गीय गोपीनाथ मुंडे ओबीसी समाजचा चेहरा व इतर समाजामध्ये त्यांची वाढलेली लोकप्रियता बघून त्यांचाही त्यावेळेला घात झाला असण्याची शक्यता व्यक्त होत होती.त्याच पद्धतीने मराठा समाज व शिवसंग्राम संघटनेचे वाढलेली ताकद व मराठा समाजाचे नेतृत्व या हेतूने कोणीतरी त्यांचा घात केला असावा अशी चर्चा सर्वत्र होत आहे.
मेटे यांच्या मृत्यूची सीबीआय सीआयडी मार्फत कसून चौकशी व्हावी,अशी माहिती सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीची प्रवक्ते व मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी पत्रकार बैठकीमध्ये माहिती दिली.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here