सांगली : विटा येथील चोरी प्रकरणातील संशयिताकडून जप्त केलेली ७ लाख ८० हाजाराची रोकड न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा पोलिस प्रमुख बसवराज तेली यांच्याहस्ते फिर्यादीस परत देण्यात आली.
अधिक माहिती अशी,विटा येथील सर्फराज युसुफ शिकलगार यांचे १० ऑक्टोंबरला जिओ मार्ट ऑनलाइन ग्रोसरी डिलीवरी सेंटरमधून मनीष देवदास झेंडे रा.नेवरी,पवन मधूकर झेंडे रा.बलवडी (खा) यांनी चोरीची कबुली दिली होती.त्यांनी सेंटरमधिल तिजोरीत असलेले ७ लाख ८० हजार रोखड,दहा हजार रूपयाची तिजोरी,३० हजार रूपये किंमतीची होंडा डिलक्स दुचाकी पळवून नेहले होते.
याप्रकरणी विटा पोलीसात दाखल गुन्ह्याचा तपास करत संशयितांना ताब्यात घेत रोखड, तिजोरी,दुचाकी असा ८ लाख २० हाजाराचा मुद्देमाल जप्त केला होता.या प्रकरणातील रोखड व मुद्देमाल परत देण्याचा आदेश न्यायालयाने नुकताच दिला आहे. त्यानुसार ७ लाख ८० हजार रोखड,१० हजार रूपयाची तिजोरी फिर्यादी सर्फराज युसुफ शिकलगार यांना जिल्हा पोलिस प्रमुख बसवराज तेली यांच्या उपस्थितीत परत देण्यात आला.