अधिक माहिती अशी,सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडीस आणण्याचे आदेश जिल्हा पोलिस प्रमुख यांनी दिले आहे.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या राजू शिरोळकर यांना राहुल चव्हाण हा विना नंबरची मोटारसायकल घेऊन अंकले येथे ऊसतोड मजूराच्या जवळ राहत असल्याची माहिती मिळाली होती.
पोलीसांनी अंकले-डोर्ली जाणाऱ्या रोडवर संशयित चव्हाण यांच्याकडे असलेल्या विना नंबरच्या दोन मोटारसायकली पंचासमक्ष जप्त केल्या.त्या त्याने सांगली व माळशिरस येथून चोरून आणल्याची कबूली पोलीसांना दिली आहे.