आवंढी : जत तालुक्यातील आंवढी येथील ऐतिहासिक श्री खंडोबा देवाची यात्रा विविध कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाली.श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त आवंढी ग्रामस्थ व श्री संत बाळूमामा सेवाभावी संस्था आवंढीचे संस्थापक गुरुवर्य श्री भारत महाराज कोडग यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
श्री खंडोबा देवाची महापूजा, धार्मिक विधी,होम हवन, पालखीची भव्य मिरवणूक व भंडारा उधळण, श्वान शर्यती, रांगोळी स्पर्धा व बक्षीस वितरण, शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप, हळदी कुंकू कार्यक्रम व साडी वाटप, महाप्रसाद,जागरण व लंगर कार्यक्रम असे अनेक कार्यक्रम पार पडले.स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचाही बक्षीस वितरण सोहळा पार पडला. गुरुवर्य श्री भारत महाराज कोडग,महेश नलवडे(शिवरत्न ज्वेलर्स सांगोला) व आवंढी ग्रामस्थ यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.
यात्रेमध्ये खेळणी, पाळणे मिकी माऊस, खाद्य पदार्थांच्या अनेक दुकानांची रेलचेल होती. सायंकाळी पाच वाजता श्री खंडोबा देवाच्या पालखीची भव्य मिरवणूक सोहळा पार पडला.यात्रेचे प्रमुख आकर्षण हे न्यू नॅशनल बँड (वाळवा) हे होते सायंकाळी आठ वाजता श्री खंडोबा देवाच्या जागरणास सुरुवात झाली व लंगर कार्यक्रम अगदी जल्लोषात पार पडला.यावेळी महेश नलवडे ,अमोल जाधव,प्रसाद चव्हाण(चेअरमन), अरुण जाधव (कासेगावकर) परिसरातील हजारो भाविकांच्या उपस्थित होती.
आंवढी ता.जत येथील खंडोबा यात्रेनिमित्त धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.