प्रतापगडाच्या संवर्धनासाठी २५ कोटी रुपयांची निधी | – मुख्यमंत्री

0

सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज,किल्ले प्रतापगड येथे शिवकालीन धाडसी खेळ आणि शिवमय वातावरणात शिवप्रतापदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.आज किल्ले प्रतापगडावर असंख्य शिवभक्तांसमवेत ३६३ वा शिवप्रतापदिन सोहळा उत्साहात साजरा केला.शिवकालीन गड – किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

 

किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनाचा १०० कोटींचा आराखडा शासनाकडे तयार असून या आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात २५ कोटींचा निधी तात्काळ देणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी यासमयी जाहीर केले.राज्य शासन छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन काम करत आहे.प्रत्येक मंत्रिमंडळाच्या बैठकीत लोकहिताचे निर्णय घेण्यात येत आहेत.हे सरकार सर्वसामान्यांचे,कष्टकऱ्यांचे सरकार आहे.राज्यातील गडकोट-किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचेही याप्रसंगी शिंदे यांनी नमूद केले.

 

किल्ले प्रतापगड येथील बुरुजावरील शिवशाहीचे प्रतीक असलेल्या भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यानंतर त्यांच्या हस्ते भवानी मातेची मनोभावे आरती करण्यात आली.छत्रपती शिवरायांची मूर्ती ठेवण्यात आलेल्या पालखीचे पुष्प अर्पण करुन भक्तिभावे पूजन केले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.पोलीस दलाच्या बॅण्ड पथकाने मानवंदना दिली तर प्रतापगडावर छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव करण्यात आला.

Rate Card

 

यासमयी मुख्यमंत्री यांच्या समवेत राज्य उत्पादन शुल्कमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई,पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा,खासदार श्रीनिवास पाटील,रणजितसिंह नाईक निंबाळकर,आमदार महादेव जानकर,भरत गोगावले,श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले,मकरंद पाटील,महेश शिंदे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.