डफळापूर,संकेत टाइम्स : गावात आम्ही मोठ्या प्रमाणात १० कोटीचा निधी आणून विकास योजना राबवू शकलो आहे.अनेक विकासात्मक कामामुळे आम्ही दिलेली आश्वासने जवळपास पुर्ण केलेली आहेत,अशी माहिती डफळापूरच्या विद्यमान संरपच श्रीमती बालिकाकाकी चव्हाण,उपसंरपच प्रतापराव चव्हाण यांनी दिली.आम्ही विकास योजना,जनहिताच्या कामामुळे ग्रामस्थाचे समाधान करू शकलो यांचाही आम्हाला आनंद आहे.
गत पाच वर्षात तब्बल १० कोटीचा निधी डफळापूर मध्ये विविध विकास कामासाठी खर्च केला आहे.शासनाकडून ग्रामपंचायतीला येणाऱ्या निधी व्यतिरिक्त नागरी सुविधा,जन सुविधा या विकास योजनातून निधी आणला आहे.
डफळापूरच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्री यांच्याकडे असलेल्या अल्पसंख्याक खात्यातून १० लाखाचा निधी आणून फकीरवाडा येथे ओढापात्रावर पुल बांधला आहे.ग्रामविकास खात्याकडून २५/१५ सारख्या महत्वपूर्ण योजनेतून निधी मिळाला आहे.त्यानिधीतून शासकीय कार्यालयानजिक बहुउद्देशीय हॉल(मंगल कार्यालय) आकारास आले आहे. नाबार्ड मधून ६० लाखाचा निधी उपलब्ध झाला होता.त्यातून मिरवाड रस्त्यावर पुल बांधण्यात आला आहे.प्रधानमंत्री सडक योजनेतून २ कोटीचा आम्ही मिळविला आहे.त्यातून मजबूत असा जायओघळ रस्ता तयार झाला आहे.
DPDC/25/15/अल्पसंख्यक/नाबार्ड/ प्रधानमंत्री/मुख्यमंत्री सडक योजना यामध्यमातून गावात प्रथमच कोट्यावधीचा निधी मिळवून त्यातून विकास कामे करण्यात आली आहेत.महाराष्ट्र शासनाच्या बजेटमधूनही रस्त्यासाठी निधी मिळावा म्हणून आम्ही पाठपुरावा केला आहे.या व्यतिरिक्त आवश्यकता असणारी अनेक विकास कामे केली आहेत.प्रामुख्याने कोळी वस्तीवर शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुरमीकरण(१ लाख),भोसले वस्तीवर मुरूम टाकणे(१.५० लाख),डफळापूर-अनंतपूर रस्ता ते राहुल पाटील घरापर्यत रस्ता(५ लाख),सोनार ओढा ते गुरूबसू माळी घरापर्यत मुरमीकरण(३ लाख),काळेशिवार पुल(.५० लाख),बस स्टँन्ड पाठीमागील कचरा उचलणे(१.०० लाख),महाजन हॉटेल समोरील(मिरवाडकडे जाणारा रोड) अतिक्रमण काढून डांबरीकरण केले(५ लाख)असे १६ लाख रूपयाचा निधीतून विकास कामे केली आहेत.आम्हाला मिळालेल्या ५ वर्षाच्या कालावधीत जवळपास अडीच वर्षे कोरोनाच्या महामारीशी लढण्यात गेली.