जत,संकेत टाइम्स : यात्रा, जत्रा म्हटली की लहान मुलांची चंगळ असते. यात्रेत फिरणे, पाळण्यात बसणे, खाद्य पदार्थांवर ताव मारणे, दंगा मस्ती करणे ठरलेले असते. पालकही आपल्या मुलांचा हा बालहट्ट पूर्ण करण्यात मग्न असतात. त्यांच्यातच आपले बालपण ते पाहत असतात, यात्रेत ते ही हरवून जातात पण लहान मूक, बधीर मुलांना यात्रेत नेणार कोण, त्यांच्या चेहऱ्यांवर आनंद फुलवणार कोण हा मुख्य प्रश्न सर्वांना विचार करायला लावणारा आहे. नुकत्याच पार पडलेल्या जतच्या या यात्रेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते आनंदाने उड्या मारणाऱ्या मूक, बधीर मुले व त्यांच्यासोबत रमलेल्या परशुराम मोरे यांनी जत येथे मूक बधीर विद्यालय आहे. या मूकबधिर विद्यालयात तीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
नुकतीच महाराष्ट्रसह कर्नाटकात प्रसिद्ध असलेली जतची श्री.यल्लमा देवीची यात्रा पार पडली.या यात्रेत लाखों भाविकांनी हजेरी लावली.यात्रा परिसर गर्दीने फुलला होता.विविध स्टॉल त्याचबरोबर पाळणे सर्वाचे लक्ष वेधून घेत होते.बाळगोपाळा पासून आबाल वृध्दापर्यत सर्वजण यात्रेचा आंनद घेत होते.वर्षातून एकदाच जतमध्ये भरणारी ही यात्रा म्हणजे जतकरांसाठी पर्वणीच होय. यात्रेच्या या आंनदापासून वंचित राहिले होते ते जत येथील मूक बधीर विद्यालयातील विद्यार्थी नेमके हेच हेरून जत येथील जागर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, जत नगरपरिषदेचे माजी सभापती परशुराम मोरे यांनी या मूक बघिर विद्यार्थ्यांना यात्रेत नेण्याचे नियोजन आखले.
विद्यालयातील सर्वच्या सर्व ३० मूक बधिर विद्यार्थ्यांनी यात्रेचा मनसोक्त आनंद लुटला. विविध स्टॉलला भेटी देत पाळण्यात बसणे, विविध खेळात भाग घेत यात्रेत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यात्रेत या मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बरेच काही सांगून जात होता. या मुलांनी परशुराम मोरे यांचे हातात हात देत आभार मानले.
समाजासाठी झटणारा नेताजागर फांऊडेशनकडून वर्षभर सामाजिक उपक्रम राबविले जातात.नेमके पुढारलेल्या समाजापासून दुर्लक्षित राहणारे घटकांना परशुराम मोरे मदतीचा हात देतात.त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्याचा सतत पुढाकार असतो.