फॅन्सी नंबर प्लेटचे फॅड वाढले !

0
6
सध्या सर्वत्र दुचाकी, चारचाकी वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेटचे फॅड दिसू लागले आहे.दादा,मामा,वा अन्य नावाच्या वेगवेगळ्या आकारात फॅन्सी नंबर प्लेट मुळे  मुळ  नंबरप्लेट ओळखणे अवघड बनले आहे.
संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.बहुतांश वाहनांवर सरकारी नियमानुसार नंबरप्लेट नाहीत.प्रतिष्ठेपायी वा फॅशन म्हणून अशा प्रकारचे नंबरप्लेट बनवितात त्यामुळे वाहनांचा नंबर कोणता आहे .ते समजत देखिल नाही.अशा नंबरप्लेट आढळल्य तर नव्या नियमानुसार पाचशे ते हजार पर्यंत दंड आकारला जातो.
सध्या सर्वत्र शहरी असो वा ग्रामीण भागांमध्ये फॅन्सी नंबरप्लेट बनवण्याचे फॅड वाढले आहे.अशा नंबरप्लेट मुळे गाडी क्रमांक ओळखता येत नाही.ही वस्तुस्थिती आहे.प्रत्येक जागरूक नागरीकांनी सुचनांचे पालन करून सहकार्य केले पाहिजे.नियम डावलले जाणार तर नाहीना याची काळजी पाहिजे.अशा प्रकारच्या नंबरप्लेट आढळल्यास  संबंधित विभागाने तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे.त्याचबरोबर नियमांचे उल्लंघन केल्यास परवाने रद्द करावेत.
मुळ क्रमांक वाहनांवर असणे आवश्यक आहे.पेंट करून किंवा रेडियमचा वापर करून फॅन्सी नंबर प्लेट बनवण्याचा कल वाढला आहे.वाहनांची नंबर प्लेट कशी असावी हे मोटार वाहन कायद्याने निश्चित करुन दिलेले आहेत.तरीही सर्वत्र फॅन्सी नंबर प्लेटचे फॅड वाढले आहे.अशा नंबरप्लेट लावणे  चुकीचे आहे.संबंधीत विभागाने याकडे तत्काळ लक्ष देण्याची आवश्यकता आहे.अशा नंबरप्लेट आढळल्यास तत्काळ कारवाई करावी.तसेच  नियमांचे उल्लंघन केल्यास परवाने रद्द करावेत तेव्हाच कुठे  आळा बसेल .
संतोष दत्तू शिंदे
मु.पो.काष्टी,ता.श्रीगोंदा, जिल्हा, अहमदनगर
महाराष्ट्र
मो.७७२१०४५८४५
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here