बनावट नोटा खपविणाऱ्या कर्नाटकातील भामट्यास पोलीसांनी पकडले !

बनावट नोटा खपविणाऱ्या कर्नाटकातील भामट्यास पोलीसांनी पकडले !

0
कवठेमहांकाळ : येथील तहसील कार्यालयासमोरील जुना बसस्थानक चौकातील एका बेकरीमध्ये साहित्य घेऊन बनावट नोटा खपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्नाटकातील एका भांमट्यास पोलीसांनी पकडले. पोपट धोंडीबा शेरखाने (वय २६, रा. नवलिहाळ, ता. अथणी) असे त्यांचे नाव असून त्याच्याकडून १४ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.हा प्रकार रात्री साडेनऊच्या सुमारास घडला आहे. कारवाई दरम्यान संशयित पोपट याचा भाऊ अशोक शेरखाने अंधाराचा फायदा घेत पळाला आहे..
कवठेमहांकाळ तहसील कार्यालयासमोरील जुन्या बसस्थानक परिसरातील एका बेकरीत पोपट व अशोक शेरखाने या दोघांनी साहित्य खरेदी केले.त्यांनी बेकरी चाल काल पैसे दिले.मात्र दुकानदारांच्या नोट बनावट असल्याचे लक्षात आले.त्यांनी चौकातच कवठेमहांकाळ-जत रस्त्यावर वाहन तपासणीसाठी उभे असलेले पोलिस नाईक सचिन पाटील या बनावट नोटाबाबत माहिती दिली.व संशयित दोघाकडे अन्य बनावट नोटा असल्याचा संशय व्यक्त केला.
पोलिसांना पाहताच संशयित पोपट व अशोक यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.पोलीस कर्मचारी सचिन पाटील यांनी पाठलाग करून संशयित पोपट शेरखाने यास ताब्यात घेतले, तर त्यांचा भाऊ अशोक फरार होण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी संशयित शेरखाने याची तपासणी केली. त्याच्याकडे तब्बल १४ हजार ५०० रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. त्यास अटक करून अशोक शेरखाने याच्या शोध सुरू केला होता. अधिक तपास उपनिरीक्षक अक्षय ठिकाणे करीत आहेत.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.