सांगली : सांगली येथे जिल्हा नियोजन बैठकीत जत तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक बाबी संदर्भात आ.विक्रमसिंह सांवत यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. नुकताच महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद थांबला असला तरी शासनाने दिलेला शब्द पूर्ण होण्याच्या दृष्टीने तत्परतेने हालचाली केल्या जाणे गरजेचे आहे.
जत तालुक्याच्या पाणी प्रश्नांबरोबरच काही आवश्यक असणाऱ्या बाबींविषयी बैठकीत प्रश्न मांडले असून ते लवकर निकाली निघावेत यासाठी तत्परतेने प्रयत्न केले जावेत,अशी मागणी पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्याकडे केली.